अयोध्या: 7 IPS, हजारो पोलीस, ब्ल्यू, येलो आणि रेड झोन, कशी आहे सुरक्षा?

अयोध्या (लखनऊ):  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचं रुप प्राप्त झालं आहे. अयोध्येत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1992 मध्ये झालेल्या विध्वंसानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा अयोध्येत दाखल झाले  आहेत. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी अयोध्येला कडेकोट सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे. अयोध्येत ब्ल्यू, येलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. […]

अयोध्या: 7 IPS, हजारो पोलीस, ब्ल्यू, येलो आणि रेड झोन, कशी आहे सुरक्षा?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

अयोध्या (लखनऊ):  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचं रुप प्राप्त झालं आहे. अयोध्येत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1992 मध्ये झालेल्या विध्वंसानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा अयोध्येत दाखल झाले  आहेत. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी अयोध्येला कडेकोट सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे.

अयोध्येत ब्ल्यू, येलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. या तिहेरी सुरक्षा कवचाची जबाबदारी पोलीस महासंचालक (तांत्रिक) राजेश पांडे आणि उपमहानिरीक्षक सुभाष सिंग यांच्याकडे यांच्याकडे आहे. राज्य पोलिसांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत , याशिवाय दंगल विरोधी पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा

अयोध्येत सुरक्षेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. 7 IPS अधिकारी संपूर्ण सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत.  सूत्रांच्या माहितीनुसार 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक, 1 पोलिस उपमहानिरीक्षक, 3 एसएसपी, 10 पोलीस सहाय्यक अधीक्षक, 21 पोलीस उपअधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल,  42 पीएस कंपनी, 5 रॅपिड अक्शन फोर्स, एटीएस कमांडो, ड्रोन कॅमेरे हा सर्व लवाजमा अयोध्येत तैनात आहे.

उद्धव ठाकरे यांचा दौरा

– उद्धव ठाकरे आज दुपारी खासगी विमानाने अयोध्येत पोहोचतील. तिथे विमानतळावर त्यांचं स्वागत होईल

–  दुपारी तीनच्या सुमारास अयोध्येतील लक्ष्मण किला इथं आज संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे.

– उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शरयू घाटावर आरती करतील

– दुसऱ्या दिवशी 25 तारखेला रामजन्मभूमीला पूजा करतील

या ऐतिहासिक दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक स्पेशल ट्रेनद्वारे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही पदाधिकारी विमानातूनही अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत देखील शिवसेनेने जोरदार तयारी केली असून महाराष्ट्रातही शिवसैनिकांमध्ये अयोध्या दौऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.

‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स

अयोध्येत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्यानेही त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण आली नसल्याचं शिवसैनिकांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सांगितलं. अयोध्येतील मंदिर परिसरातील धर्मशाळा आणि इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार

दरम्यान, ट्रेन जाणिवपूर्वक लेट केली जात असल्याचा आरोप रेल्वेकडून फेटाळण्यात आला आहे. विशेष ट्रेनचं वेळापत्रक नेहमीच मागेपुढे होत असतं असं रेल्वेचं म्हणणं आहे. नाशिकहून निघालेल्या विशेष ट्रेनने अयोध्येत 36 तासात पोहोचणं अपेक्षित होतं. पण यापेक्षाही जास्त उशिरा झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं.

राम मंदिरासाठी अध्यादेश आणा : संजय राऊत

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.

राम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो? राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या 

अयोध्या दौरा – मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची ट्रेन अयोध्येत दाखल 

व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार 

‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.