जेव्हा शाहरुख बिग बींना म्हणतो, ‘मैं आप से बदला लेने आ रहा हूं’

जेव्हा शाहरुख बिग बींना म्हणतो, ‘मैं आप से बदला लेने आ रहा हूं’

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खान अमिताभ बच्चन यांच्याशी बदला घेणार असं म्हणतो आहे. यावर अमिताभ बच्चन उत्तर देतात, आता तू काही करु शकत नाही.

शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर अमिताभ बच्चन यांना टॅग करत लिहिले की, “अमिताभ बच्चन साहेब मी बदला घेण्यासाठी येतो आहे, तयार राहा.” यावर अमिताभ बच्चन म्हणतात की, “अरे शाहरुख खान, बदला घेण्याची वेळ निघाली… आता तर सर्वांना बदला देण्याची वेळ आहे.”

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा ‘बदला’ हा सिनेमा येत्या 8 मार्चला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हे संभाषण याच सिनेमावरुन होतं.

2016 साली आलेल्या ‘पिंक’ या सिनेमातील कोर्टरुम ड्रामा हा सर्वांच्याच लक्षात असेल. या सिनेमातील महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि तापसीची जोडीही अनेकांना आवडली होती. आता हिच जोडी आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. आगामी सिनेमा ‘बदला’मध्ये हे दोघे पुन्हा एकदा सोबत काम करत आहेत. या सिनेमाची निर्मिती अभिनेता शाहरुख खानच्या रेड चिली एंटरटेनमेंटने केली आहे. शाहरुखने सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. यामध्ये आमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत शाहरुखने लिहिलं की, “आता वातावरण थोडं बदललं-बदललं आहे. हे बदला सिनेमाचं पोस्टर आहे.” तर याच्या पोस्टरवर “प्रत्येकवेळी क्षमा करणे हे बरोबर नसतं”, असं लिहिलं आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन सुजोय घोष यांनी केलं आहे. येत्या 8 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. तर 12 फेब्रुवारीला याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ‘बदला’ या सिनेमाची कहाणी मर्डर मिस्ट्री आहे. हा सिनेमा 2016 सालच्या Contratiempo नावाच्या स्पॅनिश थ्रिलर सिनेमाचा रिमेक आहे.

Published On - 9:22 am, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI