बदलापुरातील 80 वर्षांपूर्वीचा रस्ता एका रात्रीत गायब, पालिकेकडून जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल

बदलापूर गावातील पालिकेचा एक रस्ता अचानक गायब झाला आहे. यामुळे अबाल वृद्धांना चिखलातून काढावा लागत (Badlapur Village Road Get Lost) आहे.

बदलापुरातील 80 वर्षांपूर्वीचा रस्ता एका रात्रीत गायब, पालिकेकडून जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 9:16 PM

बदलापूर : बदलापूर गावातील पालिकेचा एक रस्ता अचानक गायब झाला आहे. यामुळे अबाल वृद्धांना चिखलातून काढावा लागत आहे. आमचा 80 वर्षापूर्वीचा रस्ता चोरीस गेला आहे, तो आम्हाला शोधून द्या, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहे. यामुळे पालिकेने जागेच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Badlapur Village Road Get Lost)

बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीन मधील काही महिला चिखलातून कसाबसा मार्ग काढत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी लहान मुले, महिला हे डांबरी रस्त्यावरुन ये-जा करत होते. मात्र एका दिवशी त्यांच्या रोज येण्या-जाण्याचा रस्ता गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. आता या सर्वाना येण्या-जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीनमधील पाण्याच्या टाकीच्या बाजूने एक रस्ता आहे. या भागातील शेतकऱ्यांसह 40-50 कुटुंबासाठी प्रमुख दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रस्त्याचा 200 मीटर भाग हा एका खाजगी जागा मालकाने जेसीबीच्या साहाय्याने अक्षरश: उखडून फेकून दिला. आता या रस्त्याचे अस्तित्व नष्ट झाले आहे. एवढेच नाही तर एका ठिकाणी चर खणून तो मार्गही बंद केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आधीच शहरात कोविडसारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव असताना रिक्षा, रुग्णवाहिका सोडा तर साधी दुचाकीही आत येऊ शकत नाही. त्यामुळे 80 वर्षापासूनच हा जुना रस्ता पालिकेने लवकरात लवकर बनवून द्या, अन्यथा उपोषण करु असा इशारा या नागरिकांनी दिला आहे.

“हा रस्ता माझ्या जागेतून जात असल्याने मी तो बंद केला आहे. मात्र पलिकने आमच्याकडून कायदेशीर परवानगी मागितली तर रस्ता तयार करायला आमची कोणतीही हरकत नाही,” अशी भूमिका जागेचे मालक नंदकुमार भोपी यांनी घेतली आहे.

कुळगाव बदलापूर पालिकेने जागेच्या मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे पालिकेचे मुख्यधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.

मात्र ऐन पावसाळ्यात रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वेठीस न धरता जागा मालक आणि पालिका यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, तसेच हा रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी या ठिकाणी राहणार करत आहेत. (Badlapur Village Road Get Lost)

संबंधित बातम्या : 

71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार

टीव्ही 9 चा दणका : रेशनच्या धान्यात मृत उंदीर सापडल्याचे प्रकरण, अन्न वितरण विभागाची तातडीची पावले

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.