आणेवाडी टोलनाका आंदोलन प्रकरणात शिवेंद्रराजे भोसलेंसह 16 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

आज या प्रकरणात न्यायालयातील सुनावणीनंतर शिवेंद्रराजेंसह 16 कार्यकर्त्यांना 5 हजाराच्या जातमुलख्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे.

आणेवाडी टोलनाका आंदोलन प्रकरणात शिवेंद्रराजे भोसलेंसह 16 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 6:13 PM

सातारा : मागील वर्षात राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची दुरावस्था, सुविधांचा अभाव या प्रकरणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आणेवाडी टोलनाक्यावर 18 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन केले होतं. आज या प्रतकरणात न्यायालयातील सुनावणीनंतर शिवेंद्रराजेंसह 16 कार्यकर्त्यांना 5 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Bail granted to 16 activists including Shivendra Raje Bhosale in Anewadi Tolanaka agitation case)

शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणेवाडी टोल नाक्यावर 18 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन करण्यात आलं होतं. मागील वर्षभरापासून सातारा-पुणे महामार्गाची दुरावस्था झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टीमेटमही देण्यात दिला होता. मात्र, रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट आणेवाडी टोलनाक्यावर मोर्चा नेला होता. भोसले समर्थकांनी यावेळी टोल वसुली बंद करत नाक्यावरील वाहने पैसे न घेता सोडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी वाहन चालकांना टोलनाक्यावर गुलाबाचे फुलही दिले होते. (Bail granted to 16 activists including Shivendra Raje Bhosale in Anewadi Tolanaka agitation case)

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे महामार्ग सोडला तर इतर रस्ते सुस्थितीत आहेत. मात्र, आणेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असल्याची तक्रार सामान्य प्रवासी करत होते. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं.

इतर बातम्या –

… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

भाजप आमदार शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

(Bail granted to 16 activists including Shivendra Raje Bhosale in Anewadi Tolanaka agitation case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.