नवीन वर्षात ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी

नवीन वर्षात नोकऱ्यांच्या क्षेत्रात अनेक बदल झालेले दिसत आहे. वर्ष 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे याबद्दलची माहिती एका सर्वेतून समोर आली आहे.

नवीन वर्षात 'या' क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : नवीन वर्षात नोकऱ्यांच्या क्षेत्रात अनेक बदल झालेले दिसत आहे. वर्ष 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे याबद्दलची माहिती एका सर्वेतून समोर आली आहे. नवीन वर्षात (Job demand in new year) डिजीटल आणि नवीन टेक्नॉलॉजी असणाऱ्या क्षेत्रात उमेदवारांची मागणी अधिक आहे.

आर्टिफिशल इंटेलिजेन्स (AI), मशीन लर्निंग (ML), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबॉटिक्स, ब्लॉकचेन आणि डिजिटलचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 2020 मध्ये सर्वाधिक नोकऱ्या मिळू शकतात, असा अंदाज (Job demand in new year) वर्तवला जात आहे.

60 हजारपेक्षा अधिक जॉब ओपनिंग : अॅनालिटिक्स रिपोर्ट

सध्या रुपयाची किंमत घसरल्यामुळे आणि उद्योगात तोटा होत असल्यामुळे अनेक कंपनीकडून कर्माचाऱ्यांची संख्या घटवण्यात आली. पण वर्ष 2020 मध्ये नवीन पद्धतीच्या टॉप 10 टेक कंपनीत 60 हजारपेक्षा अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज फर्म एक्सफीनो कंपनीने लावला आहे. यामध्ये डेटा अॅनालिटिक्स, अमेझॉन वेब सर्विसेज (AWS), डेटा सायन्स, ML, NLP, डेटा व्हिज्युलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स, AI आणि ब्लॉकचेनसारख्या क्षेत्रातील नोकरींचा समावेश असेल.

“या क्षेत्रात कर्माचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यांना तीन लाख ते एक कोटीपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. AI, डेटा सायन्स, AWS आणि अॅनालिटिक्समध्ये आतापर्यंत 520 पेक्षा अधिक नोकऱ्या आहेत. ज्यामध्ये 50 लाख ते एक कोटीपर्यंत सॅलरी मिळू शकते”, अशी माहिती एक्सफीनोचे को-फाऊंडर यांनी दिली.

छोट्या पदांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या क्षेत्रात 4 हजार 500 रिक्त जागा आहेत. एक्सफीनोच्या सर्वेनुसार, अधिक सॅलरीचे ऑफर एक्सेंचर, कॅपजेमिनी, आयबीएम, डेल, NVIDIA सारख्या मोठ्या कंपनी देत आहे. स्टार्टअप कंपन्याही टॅलेंटेड कर्माचारी आकर्षित करण्यासाठी मोठ्या कंपन्यांसोबत स्पर्धा करत आहेत.

Published On - 9:45 am, Thu, 26 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI