Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी कविता कौशिक बिग बॉसच्या घराची नवीन ‘कॅप्टन’!

कविता कौशिक, नयना सिंह आणि शार्दुल पंडित यांनी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. या नव्या स्पर्धकांसह सलमान खान शोमध्ये एक नवा ट्विस्ट आणला आहे.

Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी कविता कौशिक बिग बॉसच्या घराची नवीन ‘कॅप्टन’!

मुंबई : कविता कौशिक, नयना सिंह आणि शार्दुल पंडित यांनी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. या नव्या स्पर्धकांसह सलमान खान शोमध्ये एक नवा ट्विस्ट आणला आहे. यानुसार आता कविता कौशिक बिग बॉसचा घराची नवीन कॅप्टन असणार आहे. बिग बॉसचा 14 च्या तिसऱ्या वीकेंड वारमध्ये सलमान खानने दसरा आणि नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. (Bigg Boss House New Captain Kavita Kaushik)
शार्दूल, कविता आणि नयना नवीन फ्रेशर्स म्हणून घरात प्रवेश करतात. रेड झोनमध्ये तिघांपैकी कोण राहणार याबद्दल घरातील सदस्यांना विचारले जाते. त्यावेळी शार्दुल आणि नयना यांना एक सारखीच मते मिळतात. सलमान खान घरातील सदस्यांना आठवण करून देतो की, आता घरात 12 स्पर्धक आहेत. त्यानंतर सलमान जास्मीन भसीनला विचारतो की, तू कॅप्टन पदासाठी असलेला टास्क लक्षपूर्ण आणि गंभीरपणे का घेतला नाही.
या घरात पाहुणे म्हणून नोरा फतेही आणि गुरु रंधावाची एंट्री होणार आहे. नोरासंदर्भात बोलताना सलमान म्हणतो की, तिने कदाचित बिग बॉस सीझन 9मध्ये विशेष कामगिरी केली नसेल, पण त्यानंतरपासून तिने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या भागात गुरु रंधावा आणि राहुल वैद्य निक्की तंबोलीसाठी गाणे गाताना दिसणार आहेत. तर, नोरा घरातील स्पर्धकांना डान्स करण्यासाठी सांगणार आहे. घरात वाइल्ड कार्डमधून एन्ट्री केलेली नयना सिंह म्हणते की, ती प्रेमाच्या शोधात बिग बॉसच्या घरात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिग-बॉसच्या घरात स्वच्छतेवर भर
मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सेटवर ग्रीन झोन आणि रेड झोन आहेत. जिथे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केले जात आहे. बिग बॉसचा 14 चा सेट डायरेक्टर ओमंग कुमार यांनी डिझाइन केला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला आहे. घरात जे कोणी स्पर्धक आले आहेत, त्यांची आरोग्य तपासणी केली करूनच प्रवेश दिला गेला आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात मोठा हंगामा, आणखी एका स्पर्धकाची ‘विकेट’!

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?

(Bigg Boss House New Captain Kavita Kaushik)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI