Bihar election result 2020: “तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी”, बिहार निवडणुकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

"बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

Bihar election result 2020: तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी, बिहार निवडणुकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
सागर जोशी

|

Nov 10, 2020 | 6:04 PM

पुणे: ‘बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी RJDचे नेते तेजस्वी यादव यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDAला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंतिम निकाल हाती येण्यासाठी उशीर लागेल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. (NCP president Sharad pawar on bihar assembly election and Tejashwi Yadav’s campaign)

“बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध एकटे तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. या निवडणुकीत जरी बिहारमध्ये बदल झाला नसला, तरी भविष्यात तिथे बदलाची वाट मोकळी झाल्याचं पवार म्हणाले. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना जेवढी मोकळीक मिळेल तेवढा फायदा त्यांना होईल, असा अंदाज होता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बिहारच्या निवडणुकीत सहभागी झाली नव्हती, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांना मोठा फटका बसला असं म्हणता येणार नाही. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीश कुमार यांचं फार नुकसान झालं असं म्हणता येणार नसल्याचंही पवार म्हणाले. त्याचबरोबर गेली 15 वर्षे नितीश कुमार सत्तेवर असले तरी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या जंगलराज या टीकेचा परिणामही बिहारच्या लोकांच्या मनावर झाल्याचं पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचा पवारांचा टोला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result ! बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे; नितेश राणेंचं ट्विट

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ : संजय राऊत

NCP president Sharad pawar on bihar assembly election and Tejashwi Yadav’s campaign

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें