Bihar election result 2020: जावयाचा विजय, सासरे मात्र पराभूत! RJDचे नेते तेजप्रताप यादव विजयी, तर JDUचे चंद्रिका राय यांचा पराभव

तेजप्रताप यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मात्र, त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या JDUचे उमेदवार आणि तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Bihar election result 2020: जावयाचा विजय, सासरे मात्र पराभूत! RJDचे नेते तेजप्रताप यादव विजयी, तर JDUचे चंद्रिका राय यांचा पराभव

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीतील निकाल येण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यात महत्वाचा निकाल हाती आला आहे तो म्हणजे RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचा. तेजप्रताप यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मात्र, त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या JDUचे उमेदवार आणि तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत जावयाचा विजय झाला पण सासरेबुवांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा आता सुरु आहे. (RJD leader Tejpratap Yadav won while JDU leader Chandrika Rai lost)

समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून तेजप्रताप यादव हे सकाळी पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. तेजप्रताप यांच्या विरोधात JDUचे राजकुमार राय यांनी निवडणूक लढवली. पण अखेर राय यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. सारण जिल्ह्यातील परसा या मतदारसंघातून चंद्रिका राय JDUकडून निवडणूक लढवत होते. RJDच्या छोटे लाल राय यांनी चंद्रिका राय यांचा पराभव केला आहे. चंद्रिका राय हे माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद यांचे पुत्र आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचा विवाह तेजप्रताप यांच्यासोबत झाला होता. पण हे लग्न टिकलं नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यानंतर चंद्रिका राय यांनी RJDला राम-राम ठोकत JDUमध्ये प्रवेश केला होता.

चंद्रिका राय यांचा पराभव हा JDUसाठी मोठा फटका मानला जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राय यांच्या मतदारसंघात प्रचार केला होता. त्याचबरोबर मुलगी ऐश्वर्या रायही वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती. चंद्रिका राय यांनी प्रचारादरम्यान लालू प्रसाद यादव आणि तेजप्रताप यादव यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढवला होता. चंद्रिका राय हे 6 वेळा आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यात भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा पराभव केला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीत MIMचं खातं उघडलं

बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM ने खातं उघडलं आहे. तर अजून 4 जागांवर MIMचे उमेदवार आघाडीवर आहेत. बिहारमध्ये एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार सर्वाधिक असणाऱ्या सीमांचल प्रांतात एमआयएमचे 14 उमेदवार उभे होते. ओवेसी यांच्या या रणनितीने भाजप्रणित एनडीएला सर्वाधिक फायदा झाल्याचं समोर येत आहे. तर महागठबंधनला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result : बिहारमधील मंत्री आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण आघाडीवर-कोण मागे?

Bihar Election Live Update: राजदला दिलासा, तेजप्रताप यादव आघाडीवर

RJD leader Tejpratap Yadav won while JDU leader Chandrika Rai lost

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI