धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

अमरीश पटेल यांचा विजय झाला असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. BJP Amrish Patel Wins Dhule-Nandurbar Local Body Elections

 • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, धुळे
 • Published On - 9:48 AM, 3 Dec 2020
BJP Amrish Patel Wins

धुळे: धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. भाजपच्या अमरीश पटेल यांना 332, तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत, त्यामुळे अमरीश पटेल यांचा विजयी झाले आहेत. (BJP Amrish Patel Wins Dhule-Nandurbar Local Body Elections)

अमरिश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी ठरले आहेत. भाजपाच्या 199 मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या 213 मतदारांनी मतदान केले होते. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झालं होतं. आज (3 डिसेंबर )मतमोजणी झाली असता भाजपच्या अमरिश पटेलांनी विजयी गुलाल उधळला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरिश पटेल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील या दोघांमधून कोण बाजी मारणार, याची उत्कंठा ताणली गेली होती.  अखेर चित्र स्पष्ट झालं असून, भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. अखेर तो खरा ठरला आहे. BJP Amrish Patel Wins Dhule-Nandurbar Local Body Elections

विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबर 2019 या दिवशी दिला होता राजीनामा

अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबर 2019 या दिवशी राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता, आता पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर केवळ 12 महिन्यांचा कालावधी त्यांना मिळणार आहे. धुळे-नंदुरबार विधान परिषद हा एकच मतदारसंघ आहे. काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 12 मार्च 2020 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 13 मार्च 2020 ला अर्जाची छाननी झाली. 16 मार्च 2020 या दिवशी निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या जागेसाठी 30 मार्च 2020 ला मतदान प्रक्रिया तर 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता . मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे-नंदुरबार विधान परिषद या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट आहे. तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 12 मार्च 2020 हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. भाजपतर्फे माजी मंत्री अमरिश पटेल तसेच महाविकास आघाडीतर्फे भाजप मधून काँग्रेस पक्षात आलेले अभिजित पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली असून, अमरिश पटेलांनी बाजी मारली आहे. अमरिश पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली आहे.

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412 तर स्वीकृत 28 सदस्य असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र होते. मात्र, धुळे महानगरपालिकेतील लोकसंग्राम पक्षाच्या सदस्या हेमा अनिल गोटे, तसेच शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले होते, त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 झाली होती.

धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात भाजपचे 199, काँग्रेसचे 157, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष 10 सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय म्हणजेच 99 टक्के मतदान झालं होतं. अखेर या मतदानाचा अमरिश पटेल यांना फायदा झाला आहे.

 • धुळे जिल्ह्यातील एकूण मतदार
  धुळे जिल्हा परिषद – 60

  धुळे महानगरपालिका – 77
  दोंडाईचा नगरपालिका – 28
  शिरपूर नगरपालिका –  34
  साक्री नगरपंचायत – 19
  शिंदखेडा नगरपंचायत – 19
  एकूण – 237
 • नंदुरबार जिल्हातील एकूण मतदार
  नंदुरबार जिल्हा परिषद – 62

  नंदुरबार नगरपालिका – 44
  नवापूर नगरपालिका – 23
  शहादा नगरपालिका – 31
  तळोदा नगरपालिका – 21
  अक्राणी नगरपंचायत – 19
  एकूण – 200
 • संख्याबळ
  बीजेपी- 199

  काँग्रेस – 157
  एनसीपी – 36
  शिवसेना – 22
  एमआयएम – 9
  समाजवादी पार्टी – 4
  बहुजन समाज पार्टी – 1
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
  अपक्ष – 10

BJP Amrish Patel Wins Dhule-Nandurbar Local Body Elections

संबंधित बातम्या

MLC Election Result LIVE Update | धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी आमदार