कर्जमाफीच्या फक्त घोषणा, अद्याप पूर्ण कर्जमाफी नाहीच : एकनाथ खडसे

प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. (Eknath Khadse On Farmers crops loss due to Heavy rain)

कर्जमाफीच्या फक्त घोषणा, अद्याप पूर्ण कर्जमाफी नाहीच : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 10:54 AM

जळगाव : गेल्या 75 वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे.  यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Eknath Khadse On Farmers crops loss due to Heavy rain)

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने कहर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी विचारले असता त्यांनी कर्जमाफीसह सरकारांच्या अनेक योजनांवर टीका केली आहे.

गेल्या 75 वर्षापासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. आधी शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. मात्र आता आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला आहे. मात्र तेव्हापासून शेतकरी हा निसर्गाशी सामना करतोच आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

शेतकरी उद्ध्वस्त झाला असून कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढल्या आहेत. शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ झालेले नाही, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाची सरासरी यंदा अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने पंचनामे केले असेल तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपया सुद्धा पडला नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे. (Eknath Khadse On Farmers crops loss due to Heavy rain)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्रीजी घर सोडा, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल, बाळा नांदगावकरांचं टीकास्त्र

परतीच्या पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांसह विरोधकांकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.