‘माझं 3 लाख रुपये विजबील कमी केलं, मग जनतेचं का नाही?’ भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा सवाल

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे (BJP MLA Ganpat Gaikwad on Excess Electricity Bill).

'माझं 3 लाख रुपये विजबील कमी केलं, मग जनतेचं का नाही?' भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा सवाल
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 6:59 PM

ठाणे : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिलं आकारली गेली. नागरिकांनी अनेक आंदोलन केल्यानंतरही विजबील कमी करण्यात आले नाही. मात्र, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विजबीलातून 3 लाख रुपये कमी करण्यात आले. यावरुन गणपत गायकवाड यांनी महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे (BJP MLA Ganpat Gaikwad on Excess Electricity Bill). आमदाराच्या कार्यालयाचे विजबील कमी होतं, मग सर्वसामान्य नागरिकांचे विजबिल का कमी होत नाही? असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.

आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाचे महावितरणाने तब्बल 5 लाख रुपयांचे विजबील पाठवले होते. इतकी मोठी रक्कम पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी बिलातून तब्बल 3 लाख रुपये कमी केले. त्यामुळे गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत.

“आमदाराला तुम्ही 3 लाख रुपये कमी करुन देत आहात. मग सर्वसामान्य नागरिकांना 200, 400 किंवा 500 रुपये का कमी करुन देत नाहीत? महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वांना दिसून येतोय”, अशी टीका गणपत गायकवाड यांनी केली.

“मी आमदार आहे. कार्यालयात काहीतरी विचारणा करेल, गोंधळ घालेल, या भीतीने बिलातून 3 लाख कमी केले. आमदाराच्या कार्यालायचे बिल होते म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्यांचे काय?”, असा सवाल गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला.

“सर्वसामान्य जनता महावितरणाच्या कार्यालयापर्यंत पोहोचत नाही. काही नागरिक तिथे पोहोचले तर अधिकारी काहीतरी हिशोब दाखवतात. जे बिल आलंय ते भरा. मीटरमध्ये काही प्रोब्लेम असेल तर आम्ही नंतर बघू, असं अधिकारी सांगतात”, असं गणपत गायकवाड म्हणाले.

“महावितरणाच्या भोंगळ कारभारावर सर्वसामान्य जनता संतापली आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्याच कार्यालयात महावितरणाचा कॅम्प लावला होता. लोकांचं विजबील कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले”, असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा : गाऱ्हाणं मांडण्यासाठी तरुणाचा फोन, “बरं केलं, तुम्ही विजय भांबळेला पाडलं”, अजित पवारांचे चिमटे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.