अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन

वर्धा : वर्धा नागपूर मार्गावर पवनारजवळ नागपूरकडून येताना कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील चार प्रवासी जखमी झाले. दरम्यान रस्त्याने नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांना दिसले. आमदार व्यास यांनी लागलीच वाहन थांबवले. जखमींना गाडी बाहेर काढत विचारपूस केली. तसेच जखमींना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला. नागपूरच्या मानेवाडा परिसरातील […]

अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

वर्धा : वर्धा नागपूर मार्गावर पवनारजवळ नागपूरकडून येताना कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील चार प्रवासी जखमी झाले. दरम्यान रस्त्याने नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांना दिसले. आमदार व्यास यांनी लागलीच वाहन थांबवले. जखमींना गाडी बाहेर काढत विचारपूस केली. तसेच जखमींना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला.

नागपूरच्या मानेवाडा परिसरातील रहवासी हरीश पाटेकर, पत्नी कविता, रत्ना जांभळे आणि अरुण जांभळे हे वर्ध्यातील पुलंगाव येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र अचानक त्यांचे कार अनियंत्रित होत रस्त्याच्या खाली उतरली. यात कारने पलट्या  खाल्ल्याने कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले.

आमदार गिरीश व्यास यांना जखमी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाने वर्धा येथील गांधी यांच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती आमदारांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. गांधी यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करत रुग्णांना नागपूर येथे हलवण्यात रवाना झाले.

रस्त्यावर अनेक अपघात होतात, मात्र सर्वच जण मदतीसाठी पुढे सरसावतातच असे नाही. पोलिसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अनेकजण मदत करणंही टाळतात. मात्र, भाजप आमदार गिरीश व्यास यांनी अपघातग्रस्तांना मदत करुन, लोकांनी अशावेळी मदत करायला पुढे यावे, असाही संदेश दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.