VIDEO : बीडमध्ये दारुड्या भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात धिंगाणा

VIDEO : बीडमध्ये दारुड्या भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात धिंगाणा

बीड : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पक्षातर्फे उमेदवाराने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कधी पैस देऊन, तर कधी दारु देऊन प्रचारासाठी गर्दी जमवण्याचे प्रकार याआधाही उघडकीस आले आहेत. असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये  गळ्यात भाजपचा गमजा घातलेले काही कार्यकर्ते दिसत आहे. या कार्यकर्त्यांनी मद्यापान करुन भर रस्त्यात धिंगाणा घातल्याचे दिसत आहे. एकमेकांना मारहाण करत, नाचताना हे कार्यकर्ते दिसत आहेत.

बीड जिल्ह्यातील बार्शी नाका परिसरातील हा प्रकार आहे. हे कार्यकर्ते नेमके कुठे जात होते, कुणाच्या प्रचाराला जात होते, नेमकी कधीची घटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, भाजपचा गमजा घातलेले हे कार्यकर्ते असल्याने, बीडमध्ये भाजपची मात्र नाचक्की होताना दिसते आहे.

पाहा व्हिडीओ  :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI