पुण्यात दृष्टीहिन आणि दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाहसोहळा

पुण्यात दृष्टीहिन आणि दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाहसोहळा

पुणे : पुण्यात आज (11 मे) अनोखा विावाहसोहळा पाहायला मिळाला. या विवाहसोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, यामधील वधू-वर हे दृष्टीहिन आणि दिव्यांग होते. यामुळेच हा विवाहसोहळा शहरातील सर्वांसाठी विशेष ठरला. या लग्न सोहळ्यावेळी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवीत अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे दृष्टीहिन आणि दिव्यांग बांधवांनीही यावेळी उपस्थिती लावली होती.

शुक्रवाठ पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, सहकारी संस्था आणि लुई ब्रेल दृष्टीहिन अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग मुला-मुलींच्या अनोख्या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग आणि दृष्टीहिन जोडप्यांचे लग्न येथे लावण्यात आले. वाजत-गाजत या वधू-वरांचा लग्न समारंभ या संस्थेतर्फे पार पडला. नशिबाने आयुष्यात अंध:कार भरला असला तरी जिद्दीने आयुष्यात ते यशस्वी झाले. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी  प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, साहित्य, गणेशोत्सव मंडळांंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

बीड येथील महेश सातपुते या दृष्टीहिन तरुणाचा विवाह जालना येथील सिंधू शिंदे या दृष्टीहिन तरुणीशी झाला. महेश सातपुते हे बारावी पासअसून महेश आणि सिंधू हे दोघेही एकत्र काम करतात. दुसरे दाम्पंत्य हे विशाल झनकर आणि सुनंदा काळे हे दोघे ही दिव्यांग असून विशाल झनकर हा नाशिकचा असून सध्या तो खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. तर सुनंदा काळे ही मूळची बीडची असून ती देखील एका खासगी कंपनीमध्ये काम करते.

“पुण्यात येऊन माझे गणेश मंडळातील सदस्यांसोबत नाते जोडले गेले. त्यांनी माझ्या लग्नाची खूप मोठी तयारी केली. आयुष्यात मला अशी माणसे भेटतील असx कधीच वाटलं नव्हते. या देवसारख्या माणसांनी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे माझा लग्नसोहळा घडवून आणला, त्या बद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन”, असं वधू सुनंदा काळे म्हणाली.

या लग्न समारंभात कुटुंब म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांनी मदत केली. सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनीही मोठया उत्साहाने सहभाग घेतला.

Published On - 10:03 pm, Sat, 11 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI