BLOG: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काहीतरी शिजतंय…….!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात चुरसीची लढत आहे.12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.पण खरी लढत ही दोघांमध्येच असली तरी इतर उमेदवार  किती मतदान घेतात यावर निकाल अवलंबून राहू शकतो.तळकोकणात बिनसलेल्या युतीने बाळसं धरलं असलं तरी ते कितपत खरं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.काँग्रेस नावालाच निवडणूक लढवत आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये.निकाल अपेक्षीत लागो किंवा अनपेक्षीत, […]

BLOG: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काहीतरी शिजतंय.......!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात चुरसीची लढत आहे.12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.पण खरी लढत ही दोघांमध्येच असली तरी इतर उमेदवार  किती मतदान घेतात यावर निकाल अवलंबून राहू शकतो.तळकोकणात बिनसलेल्या युतीने बाळसं धरलं असलं तरी ते कितपत खरं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.काँग्रेस नावालाच निवडणूक लढवत आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये.निकाल अपेक्षीत लागो किंवा अनपेक्षीत, मात्र या मतदारसंघात काहीतरी शिजतय…. एवढं नक्की.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे.त्यांना विजय हिरावून घ्यायचा आहे. प्रतिस्पर्धी तगड्या पक्षाचा तगडा उमेदवार आहे.थेट निवडणूक प्रचार करण्यापेक्षा त्यांचा रणनीती वर जोर असेल. नारायण राणे ,नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या मनात काहीतरी शिजत असणारच. तर शिवसेनेला विजय टिकवून ठेवायचा आहे. काल महायुतीची सभा कणकवलीत संपन्न झाली. मतदारसंघात उद्धव ठाकरे सोडून दुसऱ्या कुठल्याही युतीच्या बड्या नेत्यांची सभा झाली नाही. सुरवातीला नरेंद्र मोदींची सभा रत्नागिरीत होणार अशी बातमी होती मात्र अशी सभा झालीच नाही. मुख्यमंत्र्यांची सभा नियोजीत होती मात्र ती देखील ऐनवेळी रद्द झाली. कारण…….गुलदस्त्यात! कदाचित वरिष्ठांच्या मनात काहीतरी शिजत असावं.

राज ठाकरेंनी महाराष्ट्र ढवळून काढला आहे मात्र ते ही तळकोकणात सभा घ्यायला सोयीस्कर विसरले. त्यांच्या ही मनात काहीतरी शिजत असावं. कणकवलीच्या सभेत भाजपचे प्रसाद लाड,विनोद तावडे,सुरेश प्रभू हे दिगग्ज नेते हजर होते. मात्र या तिघांनी ही सभेत राणेंबद्दल चकार शब्द  काढला नाही. राणेंना भाजप कडून,राज ठाकरें कडून बगल तर दिली जात नाही ना असा एक सूर उमटला जात आहे. यावरुन विनायक राऊतांच्या मनातही काहीतरी शिजत असेलच ना.

काल कणकवलीत आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन तेली यांच्या घरी पाहुणचार घेतला.कणकवलीत अनेक युतीचे स्थानीक नेते असताना,सेनेचे आमदार वैभव नाईक यांचं हाकेच्या अंतरावर घर असताना उद्धव मात्र तेलींच्या घरी गेले.आणि एकदा नव्हे तर दोनदा.सभा सुरू होण्याआधी आणि सभा संपल्यावर.या घटनेने अनेक राजकीय चर्चांना उत आला आहे तर कित्येक राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या. सध्या भाजपवासी झालेले राजन तेली हे पूर्वाश्रमीचे राणेंचे उजवे हात म्हणून गणले जात होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वीट राणेंच्याच अधिपत्याखाली रचली गेली होती. तेली महत्वकांक्षी आहेत…..राणेंनी त्यांना विधानपरिषदेचे आमदार बनवलं होत,आता त्यांना विधानसभेचे आमदार व्हायचं आहे.

2014 ला सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी तेलींचा पराभव केला होता.त्यांनंतर त्यांनी जोमाने मतदारसंघ काबीज करण्यावर भर दिला आहे.विळ्या-भोपळ्याच नातं विसरून केसरकर हल्ली आपण व तेली हे भावी आमदार असल्याचे बोलत आहेत.केसरकरांची ही नेमकी खेळी काय आहे हे विधानसभा निवडणुकीलाच कळेल.उद्धव यांच्या भेटीने तेलींवरचा फोकस वाढला आहे.तेलींच्या मनात काहीतरी शिजतय एवढं नक्की.तेलीच कशाला उद्धव यांच्या ही मनात आणि केसरकरांच्या ही मनात काहीतरी शिजतय.इकडे कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून संदेश पारकर,प्रमोद जठार,अतुल रावराणे इच्छुक आहेत.त्यांच्या मनात ही काहीबाही शिजत असेलच ना.लोकसभा निवडणुकी मागून अनेकजण आमदारकीसाठी आपला मतदारसंघ बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत.या सगळ्यांच्या मनात नेमकं काय शिजत आहे आणि काय शिजत होत हे येणारा काळच सांगेल.

(ब्लॉगमधील मते वैयक्तीक आहेत. टीव्ही 9 मराठी त्याबाबत सहमत असेलच असे नाही)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.