‘ना बेटा सेल्फी मत ले रे’, सेल्फी काढणाऱ्या चाहत्याशी सलमानचं उर्मट वर्तन

'राधे' चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त सलमान खान गोव्याला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

'ना बेटा सेल्फी मत ले रे', सेल्फी काढणाऱ्या चाहत्याशी सलमानचं उर्मट वर्तन

मुंबई : ‘चल बेटा सेल्फी ले ले रे’ हे ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात सुपरस्टार सलमान खानवर चित्रित झालेलं गाणं प्रसिद्ध आहे. मात्र प्रत्यक्षात सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत सलमानने उर्मट वर्तन केल्याचं समोर आलं आहे. सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच सलमानने हिसकावून (Salman Khan Angry on Selfie Seeker) घेतला.

गोवा विमानतळावर घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानतळावरुन सलमान बाहेर येत असतानाच एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काहीशा चिडलेल्या सलमानने फॅनचा मोबाईल हिसकावला आणि तो तरातरा निघून गेला.

‘राधे’ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त सलमान खान गोव्याला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सलमान इतका का चिडला आहेस? सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनो, फोटो घेण्यापूर्वी आधी परवानगी घेत जा, सन्मान ठेवा’ असा सल्ला मानव मंगलानी यांनी कॅप्शनमधून दिला आहे.

विमानतळावरुन बाहेर पडताना सलमानच्या चेहऱ्यावर संतप्त भाव दिसत आहेत. फॅनने परवानगी न घेता आगाऊपणे सेल्फी घेतल्यामुळे सलमान कातावला, की आधीच कुठल्या कारणावरुन धुमसणारा राग ‘वड्याचं तेल वांग्यावर’ या न्यायाने चाहत्यावर निघाला, हे समजलेलं नाही. तरुणाला त्याचा फोन परत मिळाला असेल, अशी आशा आहे.

सेल्फी घेण्यापूर्वी आपली परवानगी घ्यावी, अशी विनंती बरेचसे कलाकार चाहत्यांना करतात, आणि त्यात वावगंही काही नाही. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या प्रायव्हसीचा आदर चाहत्यांनी राखायला हवा, यात शंकाच नाही. परंतु सलमानने त्याच्यासोबत केलेल्या उद्दाम वर्तनाविषयी आश्चर्य (Salman Khan Angry on Selfie Seeker) व्यक्त केलं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI