कर्ज मिळवून देतो सांगत व्यावसायिकांची फसवणूक, बॉलिवूड निर्मात्याला अटक

बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून काम करणाऱ्या एका आरोपीने लोकांना कर्ज मिळवून देतो असे सांगत फसवणूक केल्याचे उघड झाले (Bollywood director ajay yadav arrested) आहे.

कर्ज मिळवून देतो सांगत व्यावसायिकांची फसवणूक, बॉलिवूड निर्मात्याला अटक
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 11:36 AM

मुंबई : बॉलिवूड आणि गुन्हेगारी क्षेत्राचा अनेकदा संबंध आला (Bollywood director ajay yadav arrested) आहे. मात्र बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून काम करणाऱ्या एका आरोपीने लोकांना कर्ज मिळवून देतो असे सांगत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अजय यादव असे अटक झालेल्या बॉलिवूड निर्मात्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक व्यावसायिकांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय यादव 2012 पासून फसवणुकीची काम करत आहे. दिल्लीतील एका व्यावसायिकाला 200 कोटी रुपयांचे कर्ज देतो सांगून त्यांने 20 लाख रुपये अॅडवान्स म्हणून मागितले होते. त्या व्यावसायिकाने 20 लाख रुपये देताच अजय यादवने व्यावसायिकाशी संपर्क तोडला.

त्या व्यावसायिकाने अनेकदा फोनवरुन पैसे मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर व्यावसायिकाला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात (Bollywood director ajay yadav arrested) आले.

यानंतर त्याने दिल्लीवरुन थेट मुंबई गाठत गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत अजय यादवला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने आतापर्यंत तब्बल 9 ते 10 जणांना अशाप्रकारे गंडा घातल्याचे समोर आलं आहे.

अजय यादवने आतापर्यंत सहा सिनेमे प्रदर्शित केले आहेत. ज्यामध्ये सस्पेन्स, साक्षी, भडास, ओव्हरटाईम या सिनेमांचा समावेश आहे. सिनेमा बनवण्यासाठी आर्थिक तंगी निर्माण झाल्याने कर्ज देणारी संस्था असल्याचे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केली. मात्र गुन्हे शाखेकडून त्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली (Bollywood director ajay yadav arrested) आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.