मोठी बातमी: मुंबईत एनसीबीचे धाडसत्र; बॉलिवूडशी संबंधित बड्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर छापे

एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. | Narcotics Control Bureau

मोठी बातमी: मुंबईत एनसीबीचे धाडसत्र; बॉलिवूडशी संबंधित बड्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर छापे
Rohit Dhamnaskar

|

Nov 08, 2020 | 12:51 PM

मुंबई: बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले. बॉलिवूडशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. (NCB conducting raids at Mumbai in Bollywood durg connection)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, या व्यक्तींची नावे एनसीबीने अद्याप उघड केलेली नाहीत. काल रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

आतापर्यंत एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश अभिनेत्रींनी आपण ड्रग्जचे सेवन केल्याचीही कबुली दिली होती. यानंतर एनसीबीकडून अभिनेत्रींना कोणाच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात होते, याचा शोध घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची एनसीबीकडून सहा तास कसून चौकशी करण्यात आली होती. करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.

संबंधित बातम्या:

Drugs Connection | करिश्मा प्रकाशची सहा तास झाडाझडती; गुरुवारी पुन्हा चौकशी होणार

Drug Connection | पुन्हा एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची भीती, दीपिकाने करिश्माला कामावरूनच काढले!

दीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले

(NCB conducting raids at Mumbai in Bollywood durg connection)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें