शनिवारवाडा उघाडा, अन्यथा महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवारवाडा उघडतील, ब्राह्मण महासंघाचा इशारा

"पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करा, अन्यथा दोन दिवसानंतर आम्ही स्वत: तो उघडू," असा इशारा ब्राह्मण महासंघाने पुरातत्व खात्याला दिला. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही भूमिका मांडली.

शनिवारवाडा उघाडा, अन्यथा महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवारवाडा उघडतील, ब्राह्मण महासंघाचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 6:51 PM

पुणे : “पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करा, अन्यथा दोन दिवसानंतर आम्ही तो स्वत: उघडू,” असा इशारा ब्राह्मण महासंघाने पुरातत्व खात्याला दिल्याची माहिती, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (brahman mahasangh demands to open shaniwar wada)

“राज्यातील ऐतिहासिक वास्तू सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. असे असतानादेखील पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शनिवारवाडा मात्र अजूनही बंदच आहे. पुरातत्व खात्याने येत्या दोन दिवसांत शनिवारवडा उघडला नाही तर ब्राह्मण महासंघाचे अधिकारी तो स्वत: उघडतील,” असं आनंद दवे म्हणाले.

दवे म्हणाले, “लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू उघडण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी दिली. परंतु, पुरातत्व खात्याला अजूनही जाग आलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय पुण्यातील शनिवारवाडा अजूनही बंद आहे. दिवाळीनिमित्त किंवा इतर काही कारणासाठी बाहेरगावचे लोक पुण्यात आल्यानंतर त्यांना शनिवारवाडा पाहण्याची इच्छा असते. परंतु तो बंद असल्यामुळे त्यांना पाहता येत नाही. हा पुणेकरांचा अपमान आहे असं आम्ही मानतो.”

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये पर्यटनस्थळेदेखील पुर्णत: बंद होती. त्यानंतर अनलॉक अंतर्गत राज्यात सर्व व्यवहार हळुहळु सुरळीत करण्यात येत आहेत. अनलॉक अंतर्गत राज्य सरकारने जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शाळा उघडण्यास परवानगी दिली. तसेच, पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळेदेखील सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. महासंघाने राज्यातील पुरातत्व खात्याला शनिवारवाडा सुरु करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. दोन दिवसांत शनिवारवाडा खुला केला नाही; तर आम्ही स्वत: शनिवारवाड्याचे दरवाजे उघडणार, असा इशारा महासंघाने दिला. ब्राह्मण महासंघाच्या या इशाऱ्यानंतर पुरातत्व खातं काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठऱणार आहे.

संबंधित बातम्या :

‘राष्ट्रवादीचा गुण नाही पण वाण लागला’, खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक

आरक्षणाच्या वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी

 ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी, तर आधी हातातील मोबाईल, घरातील सामान जाळा, संभाजी ब्रिगेडचा खोचक सल्ला

(brahman mahasangh demands to open shaniwar wada)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.