आता भारतातील दुकानदारांची Amazon आणि Flipkart ला टक्कर, 7 कोटी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम

कॅटचं हे पोर्टल सर्व भारतीय व्यावसायिकांसाठी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलमुळे परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांना मागे टाकण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

आता भारतातील दुकानदारांची  Amazon आणि Flipkart ला टक्कर, 7 कोटी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम
प्रातिनिधिक छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 29, 2020 | 4:37 PM

नवी दिल्ली : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) शुक्रवारी दिल्लीमध्ये आपल्या बहुप्रतिक्षित अशा ‘भारत-ई-पोर्टल’ (Bharat E-Market Portal)चा लोगो लॉन्च करणार आहे. कॅटचं हे पोर्टल सर्व भारतीय व्यावसायिकांसाठी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलमुळे Amazon, Flipkart आणि परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांना मागे टाकण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. कॅटअंतर्गत देशातील 7 कोटी व्यापारी या पोर्टलच्या माध्यमातून आता आपला माल विकू शकणार आहेत. (cait e commerce portal e bharat market will launch tomorrow)

प्रख्यात आंतरराष्ट्रीय वास्तू तज्ज्ञ डॉ. खुशदीप बन्सल यांच्यासोबत देशाचे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्वात मोठी राष्ट्रीय संघटना अखिल भारतीय परिवहन कल्याण संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सिंघल, अखिल भारतीय एफएमसीजी वितरक संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू आणि ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंदर खुराना, भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश सिरोही आणि ग्राहक व्हॉईसचे राष्ट्रीय संयोजक बेझोन मिश्रा हे संयुक्तपणे भारत ई मार्केटचा लोगो लॉन्च करणार आहेत.

या वेळी मास्टरकार्ड, एम्वे, एचडीएफसी बँक, श्रीराम ग्रुप, पेमेंट गेटवे कंपनी रेजर पे यांचे उच्च अधिकारीही कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांच्याकडे असणार आहेत. यासोबतच विविध राज्यांतील प्रमुख व्यापारी नेतेही या क्रार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे देशातील सर्व राज्यांमधील बडे व्यापारी नेतेदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लॉन्च सोहळ्यात सहभागी होतील. (cait e commerce portal e bharat market will launch tomorrow)

या पोर्टलअंतर्गत देशातील अनेक बड्या संघटना, ज्यांच्या सदस्य लाखोंच्या संख्येने देशातील प्रत्येक राज्यांमध्ये व्यवसाय करत आहेत. यामध्ये शेतकरी संघटना, ग्राहक संघटनेचे नेते आणि अनेक निवडक कॉर्पोरेट कंपन्यांना भारत ई कॉमर्स पोर्टलसोबत आपला नवा व्यवसाय सुरू करणार आहे.

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ई कॉमर्स व्यापार वेगाने मोठा करण्यासाठी स्मार्ट मोबाइल्स आणि इंटरनेट वापरालाही चालणा मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं व्यापारी यामध्ये सहभाग घेतील. इतकंच नाही तर व्यापारी आपल्या दुकानांव्यतिरिक्त आता ई-कॉमर्स पोर्टलद्वारे त्यांचं ऑनलाइन दुकानंही उघडू शकतील. यामुळे त्यांचा अधिक फायदा होईल.

यासाठी कॅटने व्यापाऱ्यांचे स्वतःचे ई-कॉमर्स पोर्टल सुरू करण्याचा निर्णय जवळपास 2 वर्षांपूर्वी घेतला होता आणि जवळजवळ 2 वर्षांच्या अथक तयारीनंतर आता कॅटचे ​​ई-कॉमर्स पोर्टल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. ज्याचा लोगो शुक्रवारी दिल्लीत लॉन्च करण्यात येणार आहे.

इतर बातम्या –

“पोरं निकम्मी असतात तेव्हा म्हाताऱ्या बापाला फिरावं लागतं”, पवारांच्या दौऱ्यांवरुन भाजपचं टीकास्त्र

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?

(cait e commerce portal e bharat market will launch tomorrow)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें