राज्यात दत्त जयंतीनिमित्त श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष

राज्यात दत्त जयंतीनिमित्त श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष

मुंबई/कोल्हापूर : मुंबईसह राज्यात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील नरसोबावाडी, मुंबईतील गिरगाव येथेही पुरातनकालीन दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर फक्त दत्त जयंतीला दर्शनासाठी खुले होते. गिरगावातील प्रसिद्ध असे हे मंदिर असून 110 वर्ष जुनं मंदिर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई/कोल्हापूर : मुंबईसह राज्यात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील नरसोबावाडी, मुंबईतील गिरगाव येथेही पुरातनकालीन दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर फक्त दत्त जयंतीला दर्शनासाठी खुले होते. गिरगावातील प्रसिद्ध असे हे मंदिर असून 110 वर्ष जुनं मंदिर आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा संगमतीरावर नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी हे सुंदर क्षेत्र आहे. कृष्णा तीरावर दगडी पायऱ्या घाटाच्या मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. आज दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर दुपारी चरणावर महापूजा केली जाणार आहे. पहाटे चार वाजल्यापासूनच येथे भक्तांची गर्दी वाढत आहे. तसेच यावेळी दत्त महाराजांच्या नामस्मरणाने भक्तीचा पाट ओसंडून वाहत आहे. नरसोबावाडीला दत्ताची राजधानी म्हणून ओळखले जाते.

दरवर्षीप्रमाणे येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी या उत्सवात देवस्थान समिती ग्रामपंचायत, तालुका प्रशासनातर्फे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांसाठी जगदाळे कॉलेज परिसरात पार्किंग व्यवस्था तसेच सुरक्षा बंदोबस्तसाठी सीसीटीव्ही, पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहेत. रांगेत दर्शनासाठी येथे बॅरिकेट्स लावले आहेत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागातून भाविक पायी, खासगी किंवा एसटी बसने नरसोबावाडीकडे येत आहेत. महाराष्ट्र ,कर्नाटक गोवा आदी प्रांतातून भाविकांनी जन्म कालासाठी हजेरी लावली आहे. आज संध्याकाळी चार वाजता श्री च्या मूर्तींचे आगमन मंदिरात होणार आहे. त्यानंतर 5 वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी मंडपामध्ये सूचना फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान दर्शनासाठी आलेले भाविक नदीत स्नान करतात अशावेळी कोणतीही घटना घडू नये यासाठी आठ बोटी आणि रेस्क्यू टीम सज्ज केली आहे.

माहूरमध्येही भाविकांची गर्दी

भगवान दत्तप्रभुूचे जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र माहूरमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दत्तशिखर संस्थानाचे महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त जन्मसोहळा येथे पार पडला. माहूर गड हे दत्त जन्मस्थान आणि निद्रास्थान म्हणून परिचित आहे. दत्त जयंतीला इथे दर्शनासाठी राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. प्रशासनाने या सोहळयासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें