Reaction | केंद्र सरकारने चित्रपटसृष्टी संदर्भात घेतला मोठा निर्णय, यावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया!

केंद्र सरकारने चित्रपटसृष्टीशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने चार सरकारी चित्रपट संस्था विलीनीकरण करण्यात येणार आहेत.

Reaction | केंद्र सरकारने चित्रपटसृष्टी संदर्भात घेतला मोठा निर्णय, यावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया!

मुंबई : केंद्र सरकारने (Central government) चित्रपटसृष्टीशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने चार सरकारी चित्रपट संस्था विलीनीकरण करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या निर्णयाच्या अनुषंगाने चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार, आणि चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी यासर्व संस्थांची मिळून एकच संस्था निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. (central government took a big decision regarding filmmaking)

या संस्थेचे नाव राष्ट्रीय फिल्म विकास निगम ठेवण्यात आले आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut), अभिनेता अनिल कपूर(Anil Kapoor), चित्रपट निर्माते अनिल शर्मा (Anil Sharma) यासारख्या अनेक नामवंतांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कंगना रनौतने सरकारच्या या निर्णयाला ऐतिहासिक मानले असून त्याचे उघडपणे स्वागत केले आहे. याविषयी माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनीही सांगितले की, या सर्व संस्था पूर्वीप्रमाणे काम करतील. सरकारच्या या निर्णयाचा चित्रपट जगताला मोठा फायदा होईल असा दावा देखील प्रकाश जावडेकरांनी केला आहे.

कंगना रनौत सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. तसेच, ती तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कंगनाने तिचा मेक्सिकोला गेलेला बिकिनीवरील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये कंगना बीचवर बसलेली दिसत होती. मात्र, हा फोटो तिने शेअर केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यामध्ये ट्रोलर्सने कंगनाची अक्कल काढत तिला हिंदू धर्मावर कलंक देखील म्हटले होते. मात्र, आता या सर्व प्रकरणावर कंगनाने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, सुप्रभात मित्रांनो माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक म्हणजे मेक्सिको, हे एक सुंदर ठिकाण आहे. हा फोटो मेक्सिकोमधील तुलम या बेटाचा आहे. यावर ट्रोलर्स म्हणाले होते की, तुमच्याकडे काही कपडे शिल्लक नाहीत का? तर दुसर्‍याने लिहिले होते की, आता हेच आयुष्यात राहिले आहे. जगाला सांगा की, आपण किती सभ्य आहात आणि भक्तांना सांगा की, तुम्ही किती देसी आहात.

संबंधित बातम्या : 

कोरोना वादावर कनिका कपूरचे मोठे विधान, मला आणि माझ्या मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या!

Satyameva Jayate 2 |ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, चित्रपटाचे शूटिंग थांबवले!

(central government took a big decision regarding filmmaking)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI