चंद्रकांत पाटलांनी सांगितलं सेटल होण्यासाठीचं आवडतं ठिकाण

चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या आवडतं ठिकाण सांगत मला तिथे सेटल व्हायचं आहे असंही म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी सांगितलं सेटल होण्यासाठीचं आवडतं ठिकाण
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 4:51 PM

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (26 डिसेंबर) अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात पत्रकार परिषद (press conference) घेतली. या परिषदेत त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या आवडतं ठिकाण सांगत मला तिथे सेटल व्हायचं आहे असंही म्हटलं आहे. यावरूनच त्यांनी अजित पवारांवरही जहरी टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Chandrakant Patil said he wanted to settle down in Khalapur with a population of 2200 pune press conference)

मला सेटल व्हायला 2200 लोकसंख्येचे खालापूर आवडेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अजित पवारांना आमचं काय पडलं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. शरद शरद पवारांनंतर त्यांना पक्षात काय स्थान राहील याचा त्यांनी विचार करावा अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर विखारी टीका केली आहे. तर मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे असं पाटलांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, “माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं. त्यासाठी माशेलकरांना गिरीश बापट यांनी पुणं सेटल होण्यासाठी चांगलं असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटलं की पुणं खूप चांगलं आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी 5,15 किंवा 20 वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो.”

‘मी कोल्हापूरला परत जाणार’

आपण पुण्यात स्थायिक होणार नसून मी कोल्हापूरला जाणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता त्यांनी मी कोल्हापूरला जाणार असल्याच्या वक्तव्यानंतर कुणीही हुरळून जाऊ नये, घाबरुन जाऊन नये असं स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चा झाल्यानेच आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खरंतर, कोल्हापूरला परत जाईन या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा अजित पवारांनी लगावला होता. “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईलमध्ये अजित पवार यांनी फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना कोपरखळी मारली होती. त्यावरच आज चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत अजित पवारांवर पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे :

– मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये, घाबरून जाऊ नये.

– केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नाही.

– माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही.

– 1980 ते 1993 या काळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडलं होतं.

– पुढच्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे

– मला सेटल व्हायला 2200 लोकसंख्येचे खालापूर आवडेल

– अजित पवारांना काय पडलय आमचं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, त्यांनी शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं

– मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचे

– कोल्हापुरात तीन पक्ष वेगळे लढतात हे नाटक आहे, ते सगळे एकत्र आहेत. (Chandrakant Patil said he wanted to settle down in Khalapur with a population of 2200 pune press conference)

हेही वाचा :

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र : वडेट्टीवार

तुम्हाला बोलवलंच नव्हतं, परत जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांचा टोला

(Chandrakant Patil said he wanted to settle down in Khalapur with a population of 2200 pune press conference)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.