उधारी वसुलीला गेलेल्या तरुणाला चोर समजून मारहाण, दुर्दैवी अंत!

उधारी वसुलीला गेलेल्या तरुणाला चोर समजून मारहाण, दुर्दैवी अंत!

चोर समजून नागरिकांनी एका निरपराध युवकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना चंद्रपुरात घडली.

Nupur Chilkulwar

|

Dec 20, 2019 | 6:45 PM

चंद्रपूर : चोर समजून नागरिकांनी एका निरपराध युवकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना चंद्रपुरात घडली (Youth Killed Thief Rumor). पोलिसांनी या धक्कादायक प्रकारानंतर जमावातील चौघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेत पंकज लांडगे या तरुणाचा मृत्यू झाला आहे (Chandrapur Crime).

चंद्रपूर शहरातील पागल बाबानगर परिसरात जमावाने केलेल्या मारहाणीत एका निरपराध युवकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील बल्लारपूर बायपास वळण परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवेने गेल्या दहा दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत रात्री 10.30 वाजताच्या सुमारास तुकूम भागात राहणाऱ्या 24 वर्षीय पंकज लांडगेने थकीत उधारीच्या वसुलीसाठी या परिसरात प्रवेश केला. पंकजने परिसरातील एका घरी जाऊन उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरातील लोकांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पंकजसोबत त्याचा एक मित्रही होता (Youth Killed Thief Rumor).

परिसरातील नागरिकांनी या दोघांनाही एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही मारहाण सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी पंकज आणि त्याच्या मित्राला सोडवलं. मात्र, या दोघांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच पंकज लांडगेचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

चंद्रपूरच्या पागलबाबा नगर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून चोर फिरत असल्याच्या अफवेने नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी देखील या परिसरात विविध पथके स्थापन केली. मात्र, तरीही अशा प्रकारे एखाद्याला मारहाण करणे, यामुळे लोकांची हिंसक मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

शहरातील संजयनगर, शामनगर, इंदिरानगर आणि बल्लारपूर वळण मार्गावरील भागात गेले 10 दिवस चाललेल्या चोरांच्या अफवेने नागरिक त्रस्त झाले असताना यात एक निरपराध युवकाचा जीव गेल्याने अफवा आणि जमावाची हिंसक मानसिकता यावर चिंता व्यक्त होत आहे.

Chandrapur Youth Killed Thief Rumor

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें