फळ्यावर लिहिलं मला जगण्याची इच्छा नाही, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची वर्गातच आत्महत्या

चंद्रपूर जिल्ह्यात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली (Nikhil burande 12 student suicide chandrapur)  आहे.

फळ्यावर लिहिलं मला जगण्याची इच्छा नाही, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची वर्गातच आत्महत्या

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली (Nikhil burande 12 student suicide chandrapur)  आहे. निखिल बुरांडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निखिलने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. निखिलच्या आत्महत्येमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

निखिल हा चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान गावातील कृषक कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. तो 12 वीच्या कला शाखेच्या ब तुकडीत शिक्षण घेत होता. निखिलने आज (3 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास वर्गात गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी शाळेतील वर्ग उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर शाळा व्यवस्थापनाने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान ज्या वर्गात त्याने गळफास लावून आत्महत्या केली, त्या वर्गातील फळ्यावर “मला जगण्याची इच्छा नाही, मी आत्महत्या करत आहे” असे निखिलने लिहिले होते. तसेच निखिलने कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही माफीही मागितली आहे.

सध्या पोलिसांनी घटनास्थळी याबाबत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने बारावी परीक्षेच्या तोंडावर आत्महत्या केल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात (Nikhil burande 12 student suicide chandrapur)  आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI