वृद्ध महिलेला तीन खोल्याचं लाईट बिल सव्वादोन लाख, ‘महावितरणा’चा प्रताप

वृद्ध महिलेला तीन खोल्याचं लाईट बिल सव्वादोन लाख, 'महावितरणा'चा प्रताप

चंद्रपुरातील गोंडपिपरी येथे महावितरणाच्या भोंगळपणा नुकताच उघडकीस आला (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे.

Namrata Patil

|

Dec 05, 2019 | 4:41 PM

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोंडपिपरी येथे महावितरणाच्या भोंगळपणा नुकताच उघडकीस आला (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे. एका गरीब विधवेच्या घरी वीजेची थोडीफार उपकरणं असतानाही तिला लाखोंची बिलं पाठववण्यात आली (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे. कौशल्याबाई खटुजी उईके असे या महिलेचे नाव आहे. कौशल्याबाईंनी महावितरण कार्यालयात खेटेही घातले. इतकंच नव्हे तर या महिलेच्या घरातील वीजही कापण्यात आली आहे. यामुळे या वयात कौशल्याबाईंवर अंधारात जगण्याची वेळ आली (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे.

कौशल्याबाईंच घर अवघं तीन खोल्यांचे. त्यांच्या घरात दोन किंवा तीन लाईट आणि एक छोटा टीव्ही. अशा घरात साधारण महिन्याचे लाईट बिल साधारण 500 ते 800 रुपयांपर्यंत येणं अपेक्षित आहे. मात्र गोडपिंपरीत महावितरणात नोकरी केलेल्या दिवंगत लाईनमनच्या वृद्ध पत्नीला एका महिन्याचे बिल सव्वादोन लाखांपेक्षा जास्त धाडले. लाईट बिल इतके जास्त आल्यानंतर कौशल्याबाईंनी तात्काळ कार्यालयात धाव (Chandrapur Mahavitaran irresponsible work) घेतली.

पण त्यानंतरही पुढील महिन्याचे बिलं त्यांना त्याच रकमेचे आले. या सर्व गोष्टीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने ते बिल सेटल केले. मात्र त्यानंतर महावितरणाने पुन्हा एकदा कौशल्याबाईंना झटका देत त्यांना 8 हजारांचे बिल पाठवले. या सर्व भोंगळ कारभाराला संतापलेल्या वृद्ध महिलेने ते बिलं न भरण्याचा निर्णय घेतला.

यानंतर महावितरणाने असंवेदनशीलता दाखवत घरची वीज कापली. महावितरणाची सेवा केलेल्या एका लाईनमनच्या कुटुंबावरच अंधारात राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या घरातील हे मीटर नुकतंच बसवून घेतले होते. नातवाच्या काळजीपोटी त्यांनी महावितरणकडे नाईलाजाने नव्या मीटर मागणी केली आहे.

दरम्यान गेल्या आठ दहा दिवसापासून कौशल्याबाईचा परिवार अंधारात आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभाराने परिसरातील नागरिक संतप्त असून हा कारभार वेळीच न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला (Chandrapur Mahavitaran irresponsible work) आहे.

तसेच महावितरण कंपनीत वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या लाईनमनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुबियांना अशाप्रकारे झटका देण्याच्या कारभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कौशल्याबाईंना कसा न्याय मिळेले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें