झाडातून दुधासारखे पांढरे द्रव्य, स्थानिकांकडून मंडप घालून पूजा

आकाशवाणी चौकात शासकीय निवासस्थान येथील कडुनिंबाच्या झाडातून पांढरा द्रव बाहेर येत (Chandrapur tree Superstition) असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली.

झाडातून दुधासारखे पांढरे द्रव्य, स्थानिकांकडून मंडप घालून पूजा

चंद्रपूर : आकाशवाणी चौकात शासकीय निवासस्थान येथील कडुनिंबाच्या झाडातून पांढरा द्रव बाहेर येत (Chandrapur tree Superstition) असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यामुळे स्थानिकांनी हा दैवी चमत्कार असल्याचा समज करुन याठिकाणी पूजा सुरु केली. त्यामुळे घटनास्थळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोहचले. तसेच अभ्यासकांनी हा निसर्गातील सामान्य घटनाक्रम असल्याचे (Chandrapur tree Superstition) स्पष्ट केले.

झाडातून द्रव पडत असल्याने स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दैवी चमत्कार समजून तेथे पूजा अर्चना केली. यासोबत तेथे मंडप उभारुन कडुनिंबाच्या या चमत्कारासाठी दर्शन सोहळाही सुरु केला. दररोज शेकडो नागरिक ही घटना बघण्यासाठी या भागात दाखल होत आहेत. त्यामुळे या परिसराला जत्रेचे रुप आलेले आहे.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक याबाबत जागरुक असून त्यांनी थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावत यासंबंधीचे गैरसमज लोकांमधून दूर करण्याचा प्रयत्न केला. तज्ञांच्या मते हा एक निसर्गातील सामान्य घटनाक्रम असून कडुनिंबाच्या झाडाच्या खोडातून सामान्यपणे डिंक सदृष्य असा द्राव निघत असतो. यात कुठलाही दैवी चमत्कार नाही हे स्पष्ट केले आहे.

काही झाडांमध्ये विशिष्ट बॅक्टेरिया आपले घर बनवतात. अशा झाडांच्या खोडांवर ट्युमर तयार होतो. या गाठीसारख्या भागात मुळांनी शोषलेले पाणी साठवले जाते. कालांतराने वृक्षाचे वय वाढल्यावर झाडाच्या सालीना भेगा पडतात आणि Root Pressure Theory मुळे यातील पाणी बाहेर टाकले जाते. मात्र वनस्पतीशास्त्राच्या या सिद्धांताकडे कानाडोळा करून याला दैवी चमत्काराचे रूप दिले जात आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI