Chandrayaan 2 : मोदींसोबत चंद्रयानचे लँडिंग बघण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ (Chandrayaan 2) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रयान 2 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत.

Chandrayaan 2 : मोदींसोबत चंद्रयानचे लँडिंग बघण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ (Chandrayaan 2) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रयान 2 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बसून विद्यार्थ्यांना चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग पाहता येणार आहे.

मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय यांनी उत्तर प्रदेशातील मुख्य सचिव अनूप पांडेय यांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील शाळेतील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बंगळूरमधील इस्त्रोच्या कंट्रोल रुममध्ये बसून चंद्रयानाचे लँडिंग पाहण्याची संधी मिळणार आहे.  यासाठी या विद्यार्थ्यांना एका प्रश्नउत्तराच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

माध्यमिक शिक्षणाच्या मुख्य सचिव आराधना शुक्ला यांना राज्यात सर्व शाळांत ही माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्न उत्तराच्या चाचणीसाठी 8 वी पासून 12 वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या चाचणीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही ठराविक विद्यार्थ्यांना चंद्रयान पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्रयान 2 चे सॉफ्ट लँडिंग पाहणे हा देशातील प्रत्येकासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. तसेच चंद्रयान 2 च्या सॉफ्ट लँडिंगही ही देशासाठी गर्वाची बाब आहे.

तसेच सर्व मुख्याध्यापकांनी शिक्षकांशी चर्चा करुन त्यांना याबाबतची माहिती द्यावी. या प्रश्नउत्तराच्या चाचणीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी शिक्षकांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची मदत घ्यावी असेही यात सांगितले आहे.

चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा महत्त्वाचा टप्पा नुकतंच पार केला. मंगळवारी (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर 2 सप्टेंबरला विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळे झाले. त्यानंतर येत्या 7 सप्टेंबरला दुपारी 1.55 मिनीटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी दिली.

संबंधित बातम्या  

Chandrayaan 2 : चंद्रयानाचा ‘चंद्रप्रवेश’, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?   

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI