मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचंय: संभाजीराजे

ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असं सांगतानाच मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असे उद्गार खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काढले.

मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचंय: संभाजीराजे

जालना: ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असं सांगतानाच मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असे उद्गार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले. (chhatrapati sambhaji raje addressing maratha reservation council)

जालन्यात सकल मराठा समाजाच्या परिषदेला संबोधित करताना संभाजीराजे यांनी ही भूमिका मांडली. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध झालं आहे. आता काही लोक म्हणतात या समाजाला आरक्षण नको, तर काही लोक म्हणतात ओबीसीमध्ये आरक्षण घेऊ. पण या घडीला तरी आपलं लक्ष फक्त एसईबीसी आरक्षणाकडे असलं पाहिजे. त्यामुळे दुसरी लाईन पकडायची नाही. आता फक्त एसईबीसी आरक्षण कसं टिकवायचं याचाच विचार करायचा आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असंही ते म्हणाले.

मी या परिषदेला चार्टर प्लेनने आलो. लोक म्हणतील राजे चार्टर प्लेनने येतात आणि आरक्षणाची मागणी करतात. पण आरक्षण मला नकोच आहे. 85 टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी माझी भूमिका आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (chhatrapati sambhaji raje addressing maratha reservation council)

संबंधित बातम्या:

Sambhajiraje | आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात लढत नाही – संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje | अशोक चव्हाणांनी आरक्षणासाठी काय तयारी केली, हे सांगितलं पाहिजे – संभाजीराजे छत्रपती

(chhatrapati sambhaji raje addressing maratha reservation council)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI