गुगल मॅपमधूनही शिवरायांचं दर्शन, लातूरमधील अद्भुत नजारा

लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हा व्हिडीओ आहे. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये शिवरायांची प्रतिमा दिसत आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गुगल मॅपमधूनही शिवरायांचं दर्शन, लातूरमधील अद्भुत नजारा

लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांचं विहंगम दृष्य आकाशातून दिसत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. गुगल मॅपमधूनही शिवरायांचं दर्शन या व्हिडीओत होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हा व्हिडीओ आहे. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये शिवरायांची प्रतिमा दिसत आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महेश निपानीकर यांच्यासह 10 कलाकारांनी शिवजयंतीच्या निमित्ताने ही प्रतिमा साकारली होती. पाच एकर जमिनीवर 2500 किलो विविध पद्धतीच्या बियाण्यांचा वापर करुन ही प्रतिमा साकारण्यात आली. आकाशातूनही या प्रतिमेचं दर्शन करता येत होतं.

निलंग्यातील दापता रोड येथील एनडी नाईक यांच्या शेतात ही हरित प्रतिमा साकारण्यात आली. 19 फेब्रुवारीला झालेल्या शिवजयंती उत्सवासाठी दहा दिवस अगोदरच काम सुरु करण्यात आलं होतं. गवताचं प्रतिरोपण करुन प्रतिमा साकारण्यात आली. प्रतिमा पाहता यावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI