गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी 1176 किमी स्कूटी चालवणारा ‘मांझी’, सोनं गहाण ठेवून प्रवास

अनेक परीक्षार्थी लॉकडाऊनमध्ये परीक्षा केंद्रापासून लांब गेले आहेत. त्यामुळे त्या सर्वांना परीक्षा केंद्रापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी 1176 किमी स्कूटी चालवणारा ‘मांझी’, सोनं गहाण ठेवून प्रवास
Godda To Gwalior husband drive scooty

भोपाळ (मध्य प्रदेश) : यूजीसीने भर लॉकडाऊनमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले आणि अनेक विद्यापीठांनी तशाप्रकारची तयारी सुरु केली. विद्यापीठांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं असलं, तरी अनेक परीक्षार्थी लॉकडाऊनमध्ये परीक्षा केंद्रापासून लांब गेले आहेत. त्यामुळे त्या सर्वांना परीक्षा केंद्रापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. झारखंडमधल्या गोड्डा जिल्हात राहाणाऱ्या धनंजय मांझी यांनाही अशीच काहीशी कसरत करावी लागली. (husband drive scooty 1176 km for pregnant wife)

धनंजय मांझी हे लॉकडाऊन आधी मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर शहरात एका हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांची 7 महिन्यांची गर्भवती पत्नी तिथल्याच एका महाविद्यालयात डिलेड (deled) चे पदवी शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने ते दोघेही झारखंडमधल्या गोड्डा जिल्हातील आपल्या मूळ गावी परतले. मात्र विद्यापीठांनी परीक्षा घेण्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा त्यांना ग्वाल्हेरकडे रवाना व्हावं लागलं.

गरीब परिस्थिती असल्याने खासगी गाडीचं भाडे परवडणारे नव्हते. दुसरीकडे आरक्षण करुनही रेल्वे अचानक रद्द झाल्याने तो पर्यायही हातातून निसटला होता. घरामध्ये एक स्कूटी होती, मात्र त्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्चही आवाक्या बाहेरचा होता. त्यामुळे पत्नीचे दागिने गहाण ठेऊन झारखंडच्या गोड्डा ते मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास स्कूटीवरून करण्याचं त्यांनी ठरवलं.

“दोन दिवसांत आम्ही 1176 km प्रवास केला. या काळात पेट्रोल आणि इतर खर्च असा एकूण 3500 रुपयांचा खर्च आला. आम्ही ग्वाल्हेरच्या एका लॉजमध्ये 1500 रुपये दिवसा इतके भाडे देऊन राहात आहोत. परत जातानाही आमच्याकडे ‘स्कूटी’ हा एकमेव पर्याय आहे,” अशी माहिती धनंजय मांझी यांनी दिली. स्वत: दहावी नापास असलेल्या धनंजय यांना आपली पत्नी शिक्षक झालेली पाहायचं आहे. त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्यासाठी तयार असल्याचं ते सांगतात.

(husband drive scooty 1176 km for pregnant wife)

संबंधित बातम्या 

UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना  

Special Report | शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करा, उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला UGC चा पाठिंबा 

Published On - 6:58 pm, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI