पंतप्रधान मोदींच्या खासदारकीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयाने माजी सैनिक तेजबहादूर यांना फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी सैनिक तेजबहादूर (BSF constable Tej Bahadur) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्या वकिलाला चांगलेच फटकारले आहे.

पंतप्रधान मोदींच्या खासदारकीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयाने माजी सैनिक तेजबहादूर यांना फटकारलं
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 4:29 PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी सैनिक तेजबहादूर (BSF constable Tej Bahadur) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्या वकिलाला चांगलेच फटकारले आहे. तेजबहादूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील खासदारकीला आव्हान देत ही खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर सुनावणी दरम्यान तेजबहादूर यांच्या वकिलाने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी नाराजी व्यक्त करत वकिलांना फटकारलं (CJI slams Ex BSF constable Tej Bahadur on plea against the election of PM Modi from Varanasi).

तेजबहादुर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक आयोगाने अर्जात नोकरीतून निलंबित झाल्याचं योग्य कारण दिलं नसल्याचं सांगत त्यांचा अर्ज रद्द केला. यानंतर तेजबहादूर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, मात्र तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यानंतर यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

सुनावाणी दरम्यान, तेजबहादूर यांच्या वकिलाने सांगितलं, “आम्ही निवडणूक आयोगाकडे नोकरीच्या निलंबनाचं कारण सांगण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रं जोडण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र, आयोगाने वेळ न देता असामान्य स्थितीचा आधार घेत उमेदवारी अर्जच रद्द केला.”

यावर सरन्यायाधीश (CJI) म्हणाले, “अशाप्रकारे वारंवार सुनावणी टाळली जाऊ शकत नाही. जर तुम्ही निवडणूक आयोगाकडे योग्य वेळ मागितला होता तर त्याबाबतचा अर्ज किंवा पुरावा सादर करा. त्या अर्जाची प्रत कोठे आहे की केवळ तोंडी मागणी केली होती?” यावर तेजबहादूर यांच्या वकिलाने आयोगाकडे लिखित स्वरुपात मागणी केल्याचं सांगितलं. यावर सरन्यायाधीशांनी या मागणीचा पुरावा सादर करण्यास सांगितले आहे. तसेच आम्ही अनिश्चितकाळासाठी या प्रकरणाची सुनावणी टाळू शकत नाही, असं स्पष्ट केलं. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी स्थगित का करण्यात आली होती? असा सवालही विचारला.

“तुम्ही आयोगाकडे केव्हा आणि किती वेळेची मागणी केली होती याचे आम्हाला पुरावे दाखवा. आम्हाला तुमचा युक्तीवाद ऐकायचा नाही. आता तुम्ही आयोगाकडे वेळ मागितल्याचे पुरावे दाखवा,” असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. यावेळी वकील साळवे यांनी तेजबहादूर यांच्या एका उमेदवारी अर्जात नोकरीवरील निलंबनाचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या अर्जावर तसं काहीही लिहिलेलं नाही, असं सांगितलं.

कोण आहेत माजी सैनिक तेजबहादूर

बीएसएफचे माजी सैनिक तेजबहादुर (BSF constable Tej Bahadur) यांनी सीमेवर तैनात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवनाचा मुद्दा उपस्थित करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर ते देशपातळीवर चर्चेत आले. त्यांच्या या व्हिडीओनंतर सैन्य दलाने शिस्तभंगाचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर तेजबहादूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुरुवातीला ते अपक्ष उमेदवार होणार होते, नंतर समाजवादी पक्षाने त्यांना आपली उमेदवारी दिली. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्जच रद्दबातल ठरवला.

हेही वाचा :

निमलष्करी दलात आता तृतीयपंथीही दिसणार, BSF कडून हिरवा कंदील

Pakistan spy drone | पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला, मोठा शस्त्रसाठा जप्त

अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी कारगील हिरोचा ‘फेक मेल’

संबंधित व्हिडीओ :

CJI slams Ex BSF constable Tej Bahadur on plea against the election of PM Modi from Varanasi

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.