मुख्यमंत्र्यांचा दुष्काळग्रस्त भागातील 500 हून अधिक सरपंचांशी फोनवर संवाद

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील सरपंच आणि ग्रामवेवकांशी संवाद साधला. ऑडिओ ब्रिज सिस्टमच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला. जनावरांना चारा आणि टँकरच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सरपंचांकडून सूचनाही जाणून घेण्यात आल्या. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

मुख्यमंत्र्यांचा दुष्काळग्रस्त भागातील 500 हून अधिक सरपंचांशी फोनवर संवाद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील सरपंच आणि ग्रामवेवकांशी संवाद साधला. ऑडिओ ब्रिज सिस्टमच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला. जनावरांना चारा आणि टँकरच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सरपंचांकडून सूचनाही जाणून घेण्यात आल्या. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे 500 हून अधिक सरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला. यावेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामसेवकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरपंच आणि ग्रामसेवकांनी यावेळी त्यांच्या गावांमधील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठीचे पाणी, रोहयोची कामे, जलसंधारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांसाठी वीजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती सांगितली.

चारा छावणी उपलब्ध होण्यासाठीच्या अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या काळात चारा छावण्यांच्या बाबतीत अनियमीतता झाल्याने कॅगच्या अहवालानुसार काही अटी टाकण्यात आल्या आहेत. पण तरीही विचार करुन त्यातील काही अटी शिथील करु, असे ते म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील अमोल डकाले यांनी त्यांच्या गावासाठी टँकरच्या दोन फेऱ्या मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात टँकरची एकच फेरी गावात येते अशी तक्रार केली. त्याची दखल घेत तहसीलदारांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

रोजगार नसल्याची तक्रारही सिल्लोड तालुक्यातील सरपंचांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध 28 प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.