मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार (mortgage loan waiver) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 9:19 AM

औरंगाबाद : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार (mortgage loan waiver) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबचा निर्णय घेतला आहे. नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून (mortgage loan waiver) घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, वर्ध्यात 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख रुपये जमा

या कर्जाची परतफेड करण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 65 कोटी इतक्या रक्कमेची तरतूद केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही या शासन निर्णयात म्हटलं (mortgage loan waiver) आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी “ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. महात्मा फुले कर्जमाफी योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव आहे. आतापर्यंत या कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. यातील पहिल्या यादीत 68 गावांतील 15 हजार शेतकऱ्यांचा  समावेश आहे. तर दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.