दोन बाईकवरुन हातात हात घेऊन स्टंटबाजी; तिघांचा मृत्यू; चौथा गंभीर

स्पोर्ट्स बाईकवरुन रहदारीच्या रस्त्यावर स्टंट करणं कॉलेज तरुणांच्या जीवावर बेतलं (Kolhapur bike accident) आहे. कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जात असताना तीन मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

दोन बाईकवरुन हातात हात घेऊन स्टंटबाजी; तिघांचा मृत्यू; चौथा गंभीर
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 7:36 PM

कोल्हापूर : स्पोर्ट्स बाईकवरुन रहदारीच्या रस्त्यावर स्टंट करणं कॉलेज तरुणांच्या जीवावर बेतलं (Kolhapur bike accident) आहे. कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जात असताना तीन मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आकाश कदम, सरोज पोवार आणि शिवकुमार मनेरवार अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावं आहेत. कोल्हापूर पन्हाळा रोडवरील पडवळवाडी – केर्लीजवळ हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश, सरोज, शिवकुमार यांच्यासह त्यांचा आणखी एक मित्र या चौघांनी दोन स्पोर्ट्स बाईकवरुन कोल्हापूरहून पन्हाळगडाकडे जाण्याचा प्लॅन आखला. त्या ठिकाणी जात असताना पन्हाळा रोडवरील पडवळवाडी – केर्ली या रहदारीच्या रस्त्यावर एकमेकांच्या हातात हात देत ते स्टंट करत होते. यादरम्यान पडळवाडीजवळ समोरुन आलेल्या ओमनीला दोन्ही दुचाकींची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर एक मित्र गंभीर जखमी झाला.

यात शिवकुमार आणि आकाश हे बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. ते दोघेही सांगलीतील राहणारे असून सरोज हा निमशिरगाव येथे राहणारा आहे. सरोज स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी कोल्हापुरात राहत होता. आज सुट्टी असल्याने या वर्गमित्रांनी पन्हाळ्यावर जाण्याचं नियोजन केलं होतं. मात्र स्पोर्ट बाईकवर स्टंट करणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

शेवटचा प्रवास ही एकत्र

आकाश, शिवकुमार आणि सरोज यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एकाच वर्गात सांगलीत झालं आहे. यानंतर उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते वेगळे राहत होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोल्हापुरात आलेला सरोज नरके फाऊंडेशन या ठिकाणी मार्गदर्शन घेत होता. एकाच गावात एकाच वर्गात शिकलेल्या या मित्रांचा एकत्रपणे झालेला शेवटच्या प्रवासामुळे हळहळ व्यक्त होतं (Kolhapur bike accident) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.