सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, संजय राऊतांनी ठणकावलं

मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत (Congress Seva dal book on Veer Savarkar)  छापण्यात आलेल्या पुस्तकावरुन वाद उफळला आहे.

सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, संजय राऊतांनी ठणकावलं
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 2:30 PM

मुंबई : मध्य प्रदेशातील काँग्रेस सेवादलामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत (Congress Seva dal book on Veer Savarkar)  छापण्यात आलेल्या पुस्तकावरुन वाद उफळला आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “वीर सावरकर (Congress Seva dal book on Veer Savarkar) आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“भोपाळमधले काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहित नाही. पण शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता? वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही”, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.

भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

सावरकरांवर आक्षेप घेणारे जे लोक आहेत त्यांचं डोकं तपासले पाहिजे. सतत वीर सावरकार यांच्याबद्दल आरोप करणे ही त्यांच्या मेंदूतील घाण आहे मग ते कोणीही असोत. वीर सावरकर हे आमच्यासाठी महान होते आणि राहतील, असं राऊत यांनी सांगितलं.

वादग्रस्त पुस्तक

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस सेवादलाने विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात अनेक वादग्रस्त टिपण्या आहेत. सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांबाबतचा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात केला आहे.

आशिष शेलार यांचं ट्विट

या पुस्तकवादानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल विचारत, या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.