‘बाय वन, गेट वन’ ऑफरवर खरेदी करताय?

'बाय वन, गेट वन' ऑफरवर खरेदी करताय?

पुणे : खरेदी करताना वस्तूचा मोठा पॅक म्हणजे कमी किंमत अशी साधारणपणे आपली समजूत असते. पण या समजूतीमधून कंपन्या आणि विविध ऑफर्सची प्रलोभनं दाखवणाऱ्या मॉल्सकडून सर्वसामान्य ग्राहकांची कशी लूट होते हे पुराव्यानिशी ग्राहक पंचायतीने समोर आणलं आहे. मापात पाप करणाऱ्या या कंपन्या आणि मॉल्सपासून सावध होण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आलंय.
वस्तूंच्या मोठ्या पॅकवर दिसणारी भरघोस सूट, एकावर एक फ्रीची ऑफर यामुळे तुम्ही भारावून जात असाल तर थोडं थांबा. मोठा पॅक घेतला म्हणजे तो आपल्याला कमी दरातच मिळाला असणार असा तुमचा समज असेल तर मग अधिकच लक्षपूर्वक पाहा.
जेवढा मोठा पॅक तितक्याच किंमतीच्या बाबतीत तो खोटा असतो हे ग्राहक पंचायतीने समोर आणलंय. कसं ते पाहा.. उदाहणार्थ, 100 ग्रॅम चहाची किंमत 30 रुपये आहे, तर 1 किलो पॅकच्या त्याच चहाची किंमत ही 300 रुपये असायला हवी. त्यापेक्षाही कमी असावी अशी आपली अपेक्षा असते. पण 1 किलोच्या पॅकची किंमत 430 रुपये असते. आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंवर अशी ग्राहकांची लूट केली जाते. साबण, टूथपेस्ट, चहा, कॉफी, फेयरनेस क्रिमच्या खरेदीमध्ये ग्राहकांचा खिसा कापला जात असल्याचं ग्राहक पंचायतीचं म्हणणं आहे.
मोठ्या पॅकवर वाढवलेली ही किंमत नंतर मॉल्समध्ये डिस्काउंट म्हणून कमी केली जाते, असा आरोपही ग्राहकांनी केलाय. कंपन्या आणि मॉल्समधून अशी ग्राहकांची लूट केली जाते. खरेदी करताना ग्राहक लहान पॅकचं वजन आणि त्याची किंमत आणि त्याच वस्तूच्या मोठ्या पॅकचं वजन आणि त्याची किंमत याची पडताळणी करत नाहीत त्यामुळे ग्राहक लुटले जातात.
ग्राहकांची अशी सर्रास लूट सुरु असताना या कंपन्याना कुणाचाच धाक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होतो.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI