संगमनेरमध्ये उपजीविकेची साधनं गमावलेल्या कुटुंबांना ‘कोरो’चा मदतीचा हात

गरजू नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात तग धरुन राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून 'कोरो' संस्था पुढे आली आहे (CORO Corona relief work in Sangamner).

संगमनेरमध्ये उपजीविकेची साधनं गमावलेल्या कुटुंबांना 'कोरो'चा मदतीचा हात

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर आपले उपजीविकेची साधनं गमावलेली कुटुंबं मोठ्या संकटात सापडली आहेत. या गरजू नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात तग धरुन राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून ‘कोरो’ संस्था पुढे आली आहे (CORO Corona relief work in Sangamner). या संस्थेच्या माध्यमातून अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात करुले, तीगाव, सावरगाव घुले, राहणेमळा गुंजाळवाडी या गावामध्ये साधारणपणे 100 पेक्षा अधिक गरजू कुटुंबाना महिनाभर पुरेल एवढा किरणा वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाविषयी माहिती देताना उपक्रमाचे समन्वयक संदीप आखाडे म्हणाले, “कोरो संस्थेच्या माध्यमातून संविधान प्रचारक लोकचळवळ यांनी तालुक्यातील गरजू कुटुंबाची यादी तयार केली. या यादीतील नागरिकांना महिनाभर पुरेल एवढा किराणा खरेदी करून देण्यात आला. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं देखील पालन करण्यात आलं आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“प्रथम ग्रामपंचायत, युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन गावातील गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली. ग्रामपंचायतच्या संमतीने आणि तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यासोबत समन्वय करुन गरजूंना किराणा किट पुरविण्यात आल्या. लाभार्थींची यादी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवून योग्य समन्वय करण्यात आला”, अशी माहिती उपक्रमाचे अन्य समन्वयक स्वप्निल मानव यांनी दिली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

गरजूंना मदत पोहचवण्याच्या या उपक्रमात तालुक्यातील विविध गावांमध्ये मदत पुरवण्यात आली. या कामात अनिकेत घुले, सारिका मुर्तंडक, ओंकार बिडवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव आखाडे, रावसाहेब आहेर, कैलास आखाडे, रमेश आखाडे, संजय आखाडे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 8,139 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर

‘पुनश्च: हरिओमच्या नावाखाली दारु दुकानं सुरु, हरी मात्र लॉक’, मनसेनंतर भाजप नेते इंदोरोकरांच्या भेटीला

CORO Corona relief work in Sangamner

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI