Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”नाशिक पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्तालयाकडून सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती ” date=”12/04/2020,2:54PM” class=”svt-cd-green” ] नाशिका पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्तालयाकडून सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. दोन सॅनिटायझर व्हॅन शहरातील प्रत्यक नाकाबंदीच्या ठिकाणी फिरणार आहेत, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”बारामतीत पोलिसांकडून घरपोच किराणा माल देण्यासाठी अॅप लाँच” date=”12/04/2020,2:39PM” class=”svt-cd-green” ] बारामतीत पुणे ग्रामीण पोलिसांनी घरपोच किराण माल देण्यासाठी एक नवे अॅप लाँच केलं आहे. नागरिकांना सहजरित्या किराणा माल सहज उपलब्ध व्हावा यासाठी हे अॅप तयार करण्यात आलं आहे. मराठी आणि इंग्रजीतून ऑर्डर देण्याची सोय अॅपमध्ये करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात आमदार निवासातील दोघांना कोरोना पॉझिटिव्ह ” date=”12/04/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील आमदार निवासातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर पोहोचली आहे. तर नागपुरात आतापर्यंत 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”दादर येथील सुश्रूषा रुग्णालयात कोरोनाचे 8 रुग्ण पॉझिटिव्ह ” date=”12/04/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] दादर येथील सुश्रूषा रुग्णालयात कोरोनाचे 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सगळे रुग्ण हे रुग्णालयातील कर्मचारी आहेत. डॉक्टर, नर्स, वार्डबॉय आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री 10 वाजता या 8 जणांचा अहवाल आला. मात्र अद्याप उपचार सुरू झालेले नाहीत. रुग्णालय प्रतिबंधित केलं असलं, तरी कर्मचाऱ्यांची बाहेर ये जा सुरूच आहे. त्यामुळे फैलाव होणायची शक्यता अधिक आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्हा परिषद शाळांचे प्रवेश आता ऑनलाईन होणार” date=”12/04/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे आता पुणे जिल्हा परिषद शाळांचे प्रवेश ऑनलाईन होणार आहे. पालकांना आता घरबसल्या पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. पालकांच्या मोबाईलवर लिंक पाठवली जाणार आहे. त्यावरुन प्रवेश केला जाणार आहे. आतापर्यंत 12 लोकांचे प्रवेश झाले आहे, अशी माहिती शिक्षण सभापती रणजित शिवतारे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुस्लिम समाजाचा पुढाकार, विलगीकरण रुग्णांसाठी मशिदी आणि मदरस्यातील खोल्या देणार ” date=”12/04/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात मुस्लिम समाजाने कोरोना विरुद्धच्या लढाईत पुढाकार घेतला आहे. मुस्लिम समाजाकडून मोमीनपूरा भागातील बडी मस्जिद विलगीकरण रुग्णांसाठी देण्यात येणार आहे. कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील मशिदी आणि मदरसेमधील खोल्या विलगीकरण रुग्णांसाठी देण्यात येणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण” date=”12/04/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] पोलीस कर्माचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. पण पोलीस कर्मचारी आणि त्याच्या भावाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केल जणार नाही. त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांची आरती ओवाळून, टाळ्या वाजवून सत्कार” date=”12/04/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुरात लॉकडाऊन दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची आरती ओवाळून, फुल-हार वाहून आणि टाळ्या वाजवून सत्कार करण्यात आला आहे. कोरोना तुमचं काहीच बिघडवू शकत नाही असं तुम्हाला वाटत असल्यामुळे आम्ही तुमचा हा सत्कार करत आहो अशा शब्दात मंत्रपुष्पांजली पोलिसांनी वाहिली. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील पंचताराकींत हॉटेलच्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ” date=”12/04/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेलमधील 6 कर्माचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व 6 कर्मचाऱ्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”आजपासून बारामतीत ‘बारामती पॅटर्न’ला सुरुवात ” date=”12/04/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून बारमतीमध्ये बारामती पॅटर्नला राबवण्यात येणार आहे. या पॅटर्नमध्ये समाविष्ट लोकांव्यतिरिक्त इतर कुणीही रस्त्यावर येणार नाही असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. किराणा, भाजीपाला, दूध औषधं यासह जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्यात जाणार आहेत. बारामतीत 44 वार्ड असून प्रत्येक वार्डाला एक झोनल ऑफिसर निवडण्यात आला आहे. शिवाय स्थानिक नगरसेवक आणि एक पोलीस असं तिघांचे पथक तयार करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागपूरमधील वस्त्या सील” date=”12/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्व आणि मध्य नागपूरातील अनेक वस्त्या सील करण्यात आल्या आहेत. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराचा परिसरही सील करण्यात आला आहे. सतरंजीपूरा, तेलंगपूरा, मुसलमानपुरा, तेलीपुरा, सुभाष पुतळा, माता मंदिर परिसर, रामपेठ पूर्णपणे सील केले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर परिसर बंद करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या, औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून विद्यापीठाकडे मागणी” date=”12/04/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची मागणी विद्यापीठाकडे करण्यात येत आहे. फार्मसीच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यापूर्वी पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशी शिफारस विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. देशात चार हजारांहून अधिक फार्मसी कॉलेज आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुणे महापालिका आणखी काही खासगी रुग्णालय ताब्यात घेणार ” date=”12/04/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] पुणे महापालिकेकडून आणखी काही खासगी रुग्णालय ताब्यात घेतली जाणार आहे. संशयितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चाचपणी सुरु आहे. सिम्बॉयसिस, नवले हॉस्टपिटलनंतर प्रत्येक भागातील किमान दोन खासगी हॉस्पिटल महापालिका ताब्यात घेणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनचा मोठा फटका शतेकऱ्यांना” date=”12/04/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मजूर मिळत नसल्यानं बऱ्याच भागात गव्हाची कापणी रखडली आहे. मार्केटमध्ये आधीच गव्हाची आवक कमी, त्यात गहू कापणीला मजूर मिळत नाहीत. शेतीची कामं रखडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शहरांमधील मार्केट बंद असल्यानं भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. हजारो रुपयांचा भाजीपाला शेतात पडून आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन” date=”12/04/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरातील बिडीपेठ येथील भाजी बाजारात आज पुन्हा गर्दी झाली आहे. कालच्या तुलनेत आज गर्दी जरी कमी असली तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला आहे. वस्त्यांमध्ये भाजी विक्रेते फिरत असतानाही नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI