पुण्यात इंडोटेक कंपनीकडून ‘कोरोना किलर’ उपकरण, विषाणूंपासून बचावाचा दावा

पुण्यातील इंडोटेक या कंपनीने कोरोना व्हायरसपासून बचाव करु शकणारं उपकरण शोधल्याचा दावा केला आहे (Corona Killer Machine in Pune).

पुण्यात इंडोटेक कंपनीकडून 'कोरोना किलर' उपकरण, विषाणूंपासून बचावाचा दावा

पुणे : राज्यासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत अनेकांचा मृत्यूही झालाय. अशा परिस्थितीत कोरोना लस संशोधन प्रगतिपथावर आहे. मात्र लस मार्केटमध्ये येण्यास अजून बराच अवधी आहे. मात्र पुण्यात इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीनं एक उपकरण विकसित केलंय. या उपकरणातून निर्माण होणारे आयन कोरोना व्हायरसपासून बचाव करु शकतात, असा दावा करण्यात आलाय (Corona Killer Machine in Pune).

या उपकरणाला कोरोना किलर असं नाव देण्यात आलंय. आयसीएमआर एनआयव्हीकडून या उपकरणाला कार्यक्षमता प्रमाणपत्र मिळाल्याचंही इंडोटेकने सांगितलं आहे. सध्या हे कोरोना किलर उपकरण नायडू रुग्णालयात ठेवण्यात आलंय. रुग्णालयानं या उपकरणाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा केलाय.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

हे उपकरण घर, हॉस्पिटल, शाळा, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या दुसऱ्या उपकरणात मास्क, रुग्णाचे कपडे, बेडशीट्स आणि इतर वापरातील कापड निर्जंतुक होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरुपाची मान्यता मिळालेलं हे पहिलेच उपकरण असल्याचा दावा कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी केलाय. या उपकरणाचे दर हे आयसीएमआर आणि इंडोटेक एकत्रित ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितले. या संदर्भात पेटंट आणि ट्रेडमार्कसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

हेही वाचा :

Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

Pune Corona : पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश

Pune Lockdown | पुण्यात पाच दिवस दूध, औषधांशिवाय सर्व बंद, भाजी खरेदीसाठी झुंबड

Corona Killer Machine by Indotech company in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI