उरणमध्ये आणखी 27 जणांना कोरोना, बाधितांचा आकडा 56 वर, अंत्यविधीच्या गर्दीने संसर्ग वाढल्याची भीती

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patiend increase Uran) आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे.

उरणमध्ये आणखी 27 जणांना कोरोना, बाधितांचा आकडा 56 वर, अंत्यविधीच्या गर्दीने संसर्ग वाढल्याची भीती

रायगड : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patiend increase Uran) आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. उरण तालुक्यात आज (11 मो) एकाच दिवशी 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा 56 वर पोहोचला आहे. उरणच्या करंजा गावात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली (Corona Patiend increase Uran) आहे.

उरणमधील करंजा गावात 15 दिवसांपूर्वी वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पतीचा देखील कोरोनाने मृत्यू झाला. या कोरोना बाधित व्यक्तीच्या अंत्यविधीला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या करंजा गावात आणखी कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उरण तालुक्यात काल (10 मे) एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना कोविड 19 ने उरण करंजा गावात हाहाःकार माजवला होता. आजही त्यात आणखीन भर पडत 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उरणमध्ये यापूर्वी पहिले 8 कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर काल 21 जण आणि आज पुन्हा 27 असे एकूण एकूण 56 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर त्यातील 5 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे 51 जणांवर कोरोना पॉझिटिव्ह उपचार सुरू आहेत. आणखीन पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अनेकांची कोरोना कोरोना तपासणी बाकी आहे. ज्यांची तपासणी झाली त्यातील 48 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा 100 च्या पुढे जाण्याची भीती अधिकारी वर्गांनी व्यक्त केली आहे.

रायगडमधील एकूण कोरोेना रुग्ण  

पॉझिटिव्ह रुग्ण 203

  • पनवेल महानगरपालिका – 95
  • पनवेल ग्रामीण – 51
  • उरण – 52
  • अलिबाग – 3
  • महाड – 2
  • अलिबाग – 3
  • महाड – 1

संबंधित बातम्या :

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 पार, प्रशासनाच्या कठोर निर्णयानंतरही कोरोना का पसरतोय?

Published On - 8:27 pm, Mon, 11 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI