चाहत्यांनी ‘वहिनी’ म्हणून हाक मारली, दीपिका भडकली

  • Sachin Patil
  • Published On - 13:05 PM, 2 Dec 2018
चाहत्यांनी 'वहिनी' म्हणून हाक मारली, दीपिका भडकली

मुंबई : बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका आणि रणवीरने मुंबईत सेलिब्रिटींसाठी स्पेशल रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दोघेही खुश दिसत होते. दीपिकाने स्माईल देत पती रणवीरच्या हातात हात घालून रिसेप्शनमध्ये एंट्री केली. यावेळी दोघांनीही मीडियासमोर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या.

मीडियासमोर पोज देत असतानाच दीपिका जरा नाराजही झाली. त्याला कारणही तसंच होतं. दीपिका आणि रणवीर मीडियासमोर फोटोसाठी पोज देत होते. दीपिका मीडियाजवळ पोहोचताच तिला ‘वहिनी, वहिनी’ म्हणून हाक मारण्यास सुरुवात करण्यात आली. लोक ‘वहिनी, वहिनी’ म्हणून हाक मारत असल्याचं दीपिकाला पटलं नाही आणि ती नाराज झाली.

 

दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झाल्यानंतर भारतातलं हे दुसरं रिसेप्शन होतं. एक रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बंगळुरुत झालं, तर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन झालं. या रिसेप्शननंतर मुंबईतल्या पार्टीची चाहत्यांना मोठी प्रतिक्षा होती.

दीपिका आणि रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीतील प्रसिद्ध लेक कोमो इथे लग्न केलं. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला कोंकणी पद्धतीने, तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने शाही विवाह सोहळा झाला.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं वारं वाहत असतानाच देसी गर्ल प्रियांचा चोप्राही नीक जॉनससोबत विवाहबंधनात अडकली आहे.