वडापाववाला रुग्णांचं रक्त काढताना जेरबंद, तपासणीच्या नावाखाली सायन रुग्णालयात फसवणूक

सायन रुग्णालयात दारुड्याने नकली डॉक्टर बनत तपासणीच्या नावाखाली थेट नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर (Demand of money for alcohol by Fake Doctor) आला आहे.

वडापाववाला रुग्णांचं रक्त काढताना जेरबंद, तपासणीच्या नावाखाली सायन रुग्णालयात फसवणूक

मुंबई : सायन रुग्णालयात दारुड्याने नकली डॉक्टर बनत तपासणीच्या नावाखाली थेट नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर (Demand of money for alcohol by Fake Doctor) आला आहे. विशेष म्हणजे नातेवाईकांना आपण डॉक्टर आहे हे पटवून देण्यासाठी त्याने रुग्णाचे रक्त काढलं. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण आहे. या दारुड्याला पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल गफार असं आरोपीचं (Demand of money for alcohol by Fake Doctor) नाव आहे.

आरोपी अब्दुल गफारने रात्री 11.30 वाजता कुणालाही न विचारता सायन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने रुग्णाचे रक्त काढायला सुरुवात केली. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडे 800 रुपयांची मागणी केली. त्याचवेळी रुग्णाची बायको आणि मुलाला आरोपी अब्दुल गफारवर संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आरोपी अब्दुल गफारला ताब्यात घेतलं.

अब्दुलला दारुची सवय आहे. पैसे पाहीजे म्हणून त्याने हा प्रकार केला. पण नातेवाईकांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी आरोपी अब्दुल गफारला न्यायालयासमोर हजर केले. मात्र त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे

पोलिसांनी ताब्यत घेतल्यानंतर आरोपीची विचारपूस केली असता खळबळजनक माहिती समोर आली. अब्दूलने यापूर्वी काही लॅबमध्ये काम केलं आहे. पण त्याच्याकडे रक्त काढण्याचे प्रशिक्षण नव्हते. अटकेच्यापूर्वी आरोपी सायन रुग्णालयासमोरील गेट नंबर 7 च्या समोर एका वडापावच्या गाडीवर हेल्पर म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Published On - 8:00 pm, Thu, 2 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI