VIDEO : पगाराच्या बदल्यात शरीर संबंधाला नकार, तरुणीला भररस्त्यात मारहाण

ग्रेटर नोएडा : पगाराच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणीला मारहाण होताना दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये घडली. पीडित तरुणी जेथे नोकरी करत होती त्या ठिकाणी तिचा […]

VIDEO : पगाराच्या बदल्यात शरीर संबंधाला नकार, तरुणीला भररस्त्यात मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ग्रेटर नोएडा : पगाराच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित तरुणीला मारहाण होताना दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये घडली.

पीडित तरुणी जेथे नोकरी करत होती त्या ठिकाणी तिचा पगार अडकवून ठेवण्यात आला होता. महिना होऊन 12 दिवस झाले तरी तिला पगार देण्यात आला नाही. तरुणीने वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, तिला पगार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर ही तरुणी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन पैशांची मागणी केली. त्यावेळी वाद झाला आणि आरोपींना तिला केस पकडून रस्त्यावर लाठ्या काठ्यांनी मारले.

मारहाणीनंतर पीडित तरुणीने नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्यापही कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विट करत याविरोधात तक्रार दाखल केल्याची आणि तपास सुरु असल्याची माहिती दिली. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे, “मी मार्च महिन्यापासून एका सलूनमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. मागील महिन्यात पगाराची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली. अखेर त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मी त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर वसीमने शेरा नावाच्या त्याच्या मित्रासोबत मला बेदम मारहाण केली. यात वसीमचा अन्य एक नातेवाईकही सहभागी होता.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.