LIVE UPDATE | पवारांकडून सरकारची पाठराखण, बारामतीतून देवेंद्र फडणवीसांचा निशाणा, शेतकऱ्यांची टोलवाटोलवी न करण्याचंही आवाहन

पंचनाम्याच्या भानगडीत न पडता तातडीची मदत केली पाहिजे, गुरांना चारा मिळाला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली.

LIVE UPDATE | पवारांकडून सरकारची पाठराखण, बारामतीतून देवेंद्र फडणवीसांचा निशाणा, शेतकऱ्यांची टोलवाटोलवी न करण्याचंही आवाहन
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 11:20 AM

बारामती : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बालेकिल्ल्यातून नुकसान पाहणी दौरा सुरु केला. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारची पाठराखण करण्याचं काम करत आहेत, मात्र शेतकऱ्यांची टोलवाटोलवी करु नका, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत. (Devendra Fadnavis Baramati Tour Live Update Western Maharashtra Rain affected Farmers Meet)

पंचनाम्याच्या भानगडीत न पडता तातडीची मदत केली पाहिजे, गुरांना चारा मिळाला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांनी इथे कोणतेही नेते आले नसल्याचं सांगितलं. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर सरकारमधील नेते खडबडून जागे झाले आणि पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात दौरे सुरु केले, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. उंडवडी सुपे गावाच्या पाहणीदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

काळजीवाहू मुख्यमंत्री असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मी 10 हजार कोटी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केले होते. आताही केंद्रावर ढकलून नामानिराळे राहू नका, राज्य सरकार म्हणून जबाबदारी घ्या, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब भरीव मदत करावी, अशीही मागणी फडणवीसांनी केली.

“अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या परिस्थितीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याची आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांना ठणकावलं आहे

फडणवीस-दरेकर शेतकऱ्यांच्या बांधावर

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांना दिलासा देत सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बारामतीपासून केली.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर एकत्रितपणे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावांना भेटी देणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौऱ्यात बारामती, कुरकुंभ, दौंड, भिगवण, इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करतील.

[svt-event title=”मोदींनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय, तुम्ही काय करणार सांगा : फडणवीस” date=”19/10/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] (Devendra Fadnavis Baramati Tour Live Update Western Maharashtra Rain affected Farmers Meet)

[svt-event title=”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही : देवेंद्र फडणवीस” date=”19/10/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस दौऱ्याचे लाईव्ह अपडेट” date=”19/10/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

(Devendra Fadnavis Baramati Tour Live Update Western Maharashtra Rain affected Farmers Meet)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.