राज्य सरकारच्या जाहिरातींमध्येही मोदींचा फोटो हवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुप्रीम कोर्टाने निकालपत्रात शासकीय जाहिरातींत पंतप्रधानांचा फोटो समाविष्ट करण्याचे निर्देश दिल्याचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

राज्य सरकारच्या जाहिरातींमध्येही मोदींचा फोटो हवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 3:15 PM

मुंबई : राज्य सरकारतर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख (Photos of PM Narendra Modi in Govt Ads) केला आहे.

शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित केले जात नाही. वारंवार प्रकाशित झालेल्या जाहिरातींमधून ही गोष्ट निदर्शनास आली आहे. सुप्रीम कोर्टाने 13 मे 2015 आणि 18 मार्च 2016 रोजी याबाबत सविस्तर दिशानिर्देश आपल्या निकालपत्रात दिले आहेत, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही निर्णयांचा अभ्यास करुन राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे 11 ऑगस्ट 2017 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्या परिपत्रकाचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

हेही वाचा : तीन महिन्यांत तीन ठाकरेंची राजकारणात ग्रँड एन्ट्री

परिपत्रकात शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, शासकीय संघटना यांच्या प्रत्येक जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र असावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. सद्यस्थितीत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजने अंतर्गत हमीभावाने तूर खरेदीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. या योजनेतील 100 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. असं असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांचेच छायाचित्र प्रकाशित केले जात आहे, असं फडणवीसांनी पत्रात लिहिलं आहे.

यापुढे प्रकाशित केल्या जाणार्‍या जाहिरातीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे आणि तसे निर्देश आपण संबंधित विभागाला द्यावेत, ही विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Photos of PM Narendra Modi in Govt Ads

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.