Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ, फडणवीसांनी मलिकांवरून पुन्हा डिवचलं

ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ सुरू आहे, असे म्हणत फडणवीसांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ, फडणवीसांनी मलिकांवरून पुन्हा डिवचलं
ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ, फडणवीसांनी मलिकांवरून पुन्हा डिवचलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 4:11 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील (Cm Uddhav Thackeray) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जेलमध्ये आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने आधी त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर यात गैरव्यहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केली. यात दाऊदची बहिण हसीना पारकर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याचेही मलिक यांच्यावर आरोप झाली. हा व्यवहारातील पैसा थेट दाऊदकडे गेल्याचा आरोपही भाजप नेत्यांकडून करण्यात आला. मलिकांच्या अटकेनंतर भाजपने मलिकांच्या अटकेची मागणीही जोर लावून धरली. गेल्या अधिवेशनातही यावरून बराच गदारोळ झाला. आता फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुन्हा याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी नाही, तर दाऊद गँगचे सदस्य वाचवण्यासाठी सरकारची पळापळ सुरू आहे, असे म्हणत फडणवीसांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

नवाब मलीक यांचे डी गॅंगशी संबंध ही अतिशय गंभीर बाब आहे, पण दोन वर्षे हे सरकार इम्पेरीकल डाटा आणि ओबीसी आरक्षणासाठी कुठलीही धडपळ करत नाही. पण त्याच वेळेस जेल मध्ये असलेले आणि जी गॅंगशी संबंध असलेले नवाब मलीक मंत्रिमंडळात रहायला पाहिजे, यासाठी या सरकारची धडपळ सुरु आहे. यापेक्षा अर्धी धडपळ तरी ओबीसी आरक्षणाचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी केली असती, तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, जो मंत्री दाऊदशी संबंधीत आहे अशा मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांना काम करायचं आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलेबाजी केली आहे.

ओबीसी आरक्षणाचं काय होणार?

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षाणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यावरून नेहमीचंं सासू-सुनेचं भांडण सुरू आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तसाच आहे. इंपेरिकल डेटावरूनही केंद्र राज्यावर आरोप करत आहे आणि राज्य केंद्रावर मात्र यावर अद्यापही तोडगा निघाला नाही.

हे सुद्धा वाचा

भारतात पूर्ण शांतता आहे

तसेच भारतात पूर्ण शांतता आहे. गेले अनेक वर्षे जी लांगूल चालणाची निती भारतात आणली. त्यामुळे दुफळी निर्माण झालीय. आता ती दुफळी दूर करुन आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहेत ही भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या प्रकारे मोदीजी देशाला नेतृत्त्व देत आहेत. त्यामुळे मोदीजींकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.