मधुमेहींना कर्करोगाचा धोका अधिक : रिसर्च

टाईप 1 आणि टाईप 2 या प्रकारातील मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काही विशिष्ट प्रकाराचा कर्करोग होऊ शकतो अशी धक्कादायक बाब अमेरिकेतील एका संशोधनात उघडकीस आली आहे. 'अमेरिकन केमिकल सोसाटी फॉल 2019' यातील एका चर्चेदरम्यान याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार आहे.

मधुमेहींना कर्करोगाचा धोका अधिक : रिसर्च
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 1:09 PM

वॉशिंग्टन (अमेरिका) : मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींना कर्करोग (Cancer) होण्याचा धोका अधिक असल्याचा एका संशोधनात उघडकीस आले आहे. टाईप 1 आणि टाईप 2 या प्रकारातील मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काही विशिष्ट प्रकाराचा कर्करोग होऊ शकतो अशी धक्कादायक बाब अमेरिकेतील एका संशोधनात उघडकीस आली आहे. ‘अमेरिकन केमिकल सोसाटी फॉल 2019’ यातील एका चर्चेदरम्यान याबाबतचा अहवाल मांडण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तींच्या रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यांचा डीएनए लवकर खराब होतो. मात्र त्या तुलनेत ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण नीट असणाऱ्याचा डीएनएचे नुकसान होण्याचा धोका कमी असतो. रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्या व्यक्तींच्या डीएनए नुकसान होते आणि ते बरे होण्याचे शक्यता फार कमी असते, असे यात स्पष्ट झाले आहे.

जॉन टेरमिनी यांनी या संशोधनाबाबत दिलेल्या माहितीनुसार, यावेळच्या संशोधनात बराच कालावधीनंतर अशाप्रकारची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या व्यक्तींना डायबीटीजचा धोका असता, त्यांना काही खास प्रकारच्या कर्करोगाचा धोका संभवतो. यात किडनी, ब्रेस्ट, गर्भाशय अशा प्रकारचा कर्करोगांचा समावेश आहे.

संशोधकानुसार मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका जास्त असण्याचे कारण हॉर्मोनल डिसरेग्युलेशन आहे. टाईप 2 प्रकराचा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन ग्लुकोज पेशींपर्यंत नीट पोहोचत नाही. यामुळेच पैंक्रियाज इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे हाइपर इन्सुलिनीमियात वाढ होते अशी माहिती जॉन टेरमिनी यांनी दिली.

इन्सुलिन रक्तातील साखरचे नियंत्रण ठेवण्यासोबतच पेशींच्या वाढीवर परिणाम करतो आणि याच कारणामुळे कर्करोग होऊ शकतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात ग्लुकोजचे प्रमाण जास्त आहे त्यांच्या डीएनएवर परिणाम होतो. तसेच त्या व्यक्तींच्या जीनोम म्हणजेच जनुकीय कुंडलीवरही अस्थिर होते आणि कर्करोगाचा धोका वाढतो असेही या संशोधनादरम्यान समोर आले आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींना डीएनएचे नुकसान झाल्यास त्यावर उपचार करण्यास अडचणी का उद्भवतात याबाबतही संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, शरीरातील पेशींना व्यवस्थित ठेवण्याचे काम हे जनुके करत असते. मात्र HIf1 आणि सिग्नलिंग प्रोटीन mTORC1 यात साखरेचे प्रमाण जास्त झाल्याने पेशींच्या कामावर परिणाम जाणवतो. त्याचमुळे मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या पेशींवर उपचार होत नाहीत.

दरम्यान सध्या बाजारात जनुके (जीन) आणि प्रोटीन वाढवण्यासाठी फार औषध उपलब्ध आहेत. मात्र या औषधांमुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका कमी होतो हा हे अद्याप समोर आलेले नाही.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.