महागडी कार स्वस्तात देतो म्हणून ओएलएक्सवर डॉक्टरची फसवणूक

मुंबई : ओएलएक्सच्या माध्यमातून बुलडाण्याच्या एका डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ठाण्यातील पृथ्वी अमीन आणि त्याचा साथीदार रुनीतशहा या दोघांना अटक करण्यात आली आहे. ओएलएक्सवर महागडी कार स्वस्तात विकण्याचं लालूच देत या दोघांनी बुलडाण्याच्या डॉक्टरकडून तब्बल 1 लाख 98 हजार रुपये लूटले होते. डॉ. प्रदीप हे बुलडाण्यात राहतात. त्यांनी […]

महागडी कार स्वस्तात देतो म्हणून ओएलएक्सवर डॉक्टरची फसवणूक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : ओएलएक्सच्या माध्यमातून बुलडाण्याच्या एका डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ठाण्यातील पृथ्वी अमीन आणि त्याचा साथीदार रुनीतशहा या दोघांना अटक करण्यात आली आहे. ओएलएक्सवर महागडी कार स्वस्तात विकण्याचं लालूच देत या दोघांनी बुलडाण्याच्या डॉक्टरकडून तब्बल 1 लाख 98 हजार रुपये लूटले होते.

डॉ. प्रदीप हे बुलडाण्यात राहतात. त्यांनी ओएलएक्सवर 2016 सालच्या 50 लाख 60 हजार किमतीच्या ग्रे इटिओस लिव्हा कारची जाहीरात बघितली. त्यांना ही गाडी फार आवडली आणि ती परवडतही होती. त्यामुळे त्यांनी ही जाहीरात देणाऱ्याशी म्हणजेच पृथ्वी अमीनशी ओएलएक्सवर बोलणी केली. त्यानंतर या दोघांचे फोनवर बोलणे झाले, तेव्हा पृथ्वी अमीनने ती गाडी आपल्याला 2 लाख 75 हजाराला विकायची असल्याचं सांगितलं.

पृथ्वी अमीन याने तो ठाण्याच्या आर मॉल येथे एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याचं डॉ. प्रदिप यांना सांगितले. ही कार त्याला 31 डिसेंबर पर्यंत विकायची आहे, त्यामुळे लवकर निर्णय घेण्याचा त्याने डॉ. प्रदिप यांना आग्रह केला. त्यामुळे 31 डिसेंबरला डॉ. प्रदिप हे त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या गणेशसोबत ठाण्याला आले. त्यानंतर पृथ्वी अमीन त्यांना आर मॉल येथे सर्व्हिस रोडवर गाडी पाहण्यासाठी बोलावले. तेथे मॅकेनिकने गाडी तपासून ती व्यवस्थित असल्याचे सांगितले.

अमीनने गाडीचे आरसी बुक, विम्याचे कागदपत्र, टीटी फॉर्म, आधारकार्ड, पनकार्ड ही सर्व कागदपत्रे डॉ. प्रदिप यांना मोबाईलवर पाठवली. गाडीची कागदपत्र खरी आहेत, असे डॉ. प्रदिपला वाटले. म्हणून त्यांनी अमीनला 1 लाख 78 हजार रुपयांचे टोकन देत गाडी ताब्यात घेतली.

त्यानंतर ते गाडी घेऊन 1 जानेवारीला बुलडाण्यात आले. 2 जानेवारीला मॅकेनिक अमोल याचा फोन डॉ. प्रदिप यांना आला आणि त्याने गाडीची कागदपत्र खोटी असल्यामुळे एनओसी मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. यानंतर गोंधळलेल्या डॉ. प्रदिप यांनी अमीनला फोन लावला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. ते अमीनने सांगितलेल्या पोखरण येथील घरी गेले, तेव्हा तो पत्ताही खोटा असल्याचं त्यांना कळाले. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजले. त्यानंतर डॉ. प्रदिप यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणाची दखल घेत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने या फसव्या पृथ्वी अमीनचा शोध घेत त्याला अटक केली. तसेच या फसवणुकीत त्याची मदत करणाऱ्या त्याचा साथीदार रुनीतशहा यालाही अटक केली. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.