सव्वा लाख रुपयांचा दंड, मालकाने दिलेले पैसे घेऊन ट्रक चालक फरार

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor Vehicle Act) वाहतूक नियम (Traffic Rule) मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीतील एका वाहन मालकाला दुहेरी फटका बसला आहे.

सव्वा लाख रुपयांचा दंड, मालकाने दिलेले पैसे घेऊन ट्रक चालक फरार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 10, 2019 | 12:31 PM

नवी दिल्ली: नव्या मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor Vehicle Act) वाहतूक नियम (Traffic Rule) मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीतील एका वाहन मालकाला दुहेरी फटका बसला आहे. वाहन चालकाने गाडीतून मर्यादेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली. त्यामुळे त्याला नव्या वाहन कायद्यानुसार 1.16 लाख रुपयांचा दंड झाला. त्यानंतर मालकांने दंडाची रक्कम चालकाला देऊन भरण्यास सांगितली. मात्र, दंड न भरता चालक थेट फरार झाल्याचा प्रकार समोर आला.

पोलिसांनी वाहन मालक यामीन खान यांच्या तक्रारीवरुन चालक जाकिर हुसेनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक हुसेनला उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमधून अटक केली. तो दंडाची रक्कम घेऊन गावाकडे पळून आला होता. वाहन मालक यामीन खान यांनी चालक हुसेनला 5 महिन्यांपूर्वी कामावर ठेवले होते. तेव्हापासून दंडाची रक्कम भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे देण्याची ही पहिलीच वेळ होती. खान यांच्या वाहनातून धान्याची वाहतूक केली जात होती. गाडीला दंड झाल्यानंतर मालकाने चालक हुसेनला चांगलेच सुनावले होते. त्यामुळे याचा राग येऊन हुसेनने आपल्या मालकाला धडा शिकवायचं ठरवलं. त्यातूनच त्याने असं कृत्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाहन मालक खान म्हणाले, “1 सप्टेंबरला ट्रक दिल्‍लीहून हरियाणाला जात होती. त्यावेळी गाडीत मर्यादेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने 1.16 लाख रुपयांचा दंड झाला. चालकाकडे इतकी मोठी रक्कम नसल्याने त्याने दंडाची पावती माझ्याकडे दिली. त्यानंतर मी चालक हुसेनकडे दंड भरण्यासाठी पैसे दिले. मात्र, दुसऱ्या दिवशीपासून त्याने माझा फोन उचलणे बंद केले. मी रेवाडी आरटीओमध्ये (RTO) चौकशी केली असता चालक पैसे घेऊन तेथे गेलाच नव्हता.”

हुसेनचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो त्याच्या गावाकडं चालला असल्याचं समजलं. शनिवारी तो घरी पोहचल्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आलं. त्याच्याकडून दंडाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याला दिल्लीला आणण्यात आलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें